होळ येथील मुस्लिम समाजातील नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाज कंटकांना अटक करण्याची युथ फोरमची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 18 सितंबर 2020

होळ येथील मुस्लिम समाजातील नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाज कंटकांना अटक करण्याची युथ फोरमची मागणी.


विडिओ बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


सेलू ( प्रतिनिधी दि.18/09/2020 ) होळ तालूका केज जिल्हा बिड येथील मुस्लिम समाजातील नागरीकांवर हल्ला करण्यार्या समाजकंटक दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री मा. ना. अनिलजी देशमुख यांच्या कडे उपजिल्हाधिकारी सेलू मार्फत युथ फोरम सेलू तर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

             उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  दिनांक १६ सप्टेंबर रोजी धारूर येथील तबलिग जमातचे अमीर(प्रमुख) काझी निजामुद्दीन व त्यांचे साथीदार अंबाजोगाई  येथे एका अंत्यविधी कार्यासाठी जात असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या कार मध्ये तांत्रिक अडचण झाल्याने ते रस्त्याच्या बाजूला थांबले होते. या वेळी काही अज्ञात समाजकंटकांनी  जातीवाचक व धार्मिक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात काझी निजामुद्दीन व सोहेल तांबोळी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाने हल्ला होणे खुप चिंताजनक बाब आहे.  या पुर्वी पुण्यात मोहसीन शेख व पालघर येथे साधुंची माॅबलिंचिंग द्वारे हत्या करण्यात आली होती... आता धारुरच्या लोकांना धर्माच्या आधारावर मारहाण करणे म्हणजे माॅबलिंचिंगचाच भाग आहे व ही एका प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावर हल्ला करणेच आहे.  राज्यात कायदा व व्यवस्था बिघडेल व सामाजिक वातावरण दूषित होईल या अनुषंगाने धर्माच्या नावावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. 

       निवेदनावर युथ फोरमचे शेख साजीद, शेख मुखिद, अमजद बागवान, डॉ. मुताहेर खान,मोईन सिद्दिकी, शोहेब हाश्मी, करीम खान, गोरख पारवे, विजय वाघ, चंदु लोखंडे,दाऊद खान,शेख ईब्राहीम, इमरान सौदागर, एजाज खान, शेख खाजा अदिंची स्वाक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें