प्रतिनिधी, औरंगाबाद,दि.17/09/2020.
औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल २९ तक्रारदार तथा आंदोलन कर्ते मागच्या दोन ते तीन वर्षापासून प्रशासनातील विविध भ्रष्टाचार व मनमानी कारभाराविरुद्ध विविध अर्ज/ तक्रार/ निवेदन देऊन, प्रकरणात शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून, त्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करत करत होते. त्यानुसार वेळ त्यांनी प्रसंगी आंदोलन, उपोषण आदी करून वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले होते.
या सर्व तक्रारदारांनी विविध तक्रार अर्ज प्रकरणांमध्ये दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्यासमोर आमरण उपोषण केले असता, त्यामध्ये मा. विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर साहेब यांनी तत्कालीन मा. जिल्हाधिकारी श्री उदय चौधरी यांना प्रत्यक्ष बोलावून सर्वा समक्ष चर्चा करून, त्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की, सदर सर्व प्रकरणांमध्ये आपण रीतसर सुनावणी घेऊन तक्रारदार व संबंधित लोक तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे जाब-जबाब नोंदवून त्यांचे लेखी म्हणणे घेऊन, प्रकरणात अंतिम निर्णय घ्यावा व त्यानुसार पुढील योग्य ती अंतिम कायदेशीर कारवाई करावी.
त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी (लोकसेवक) श्री उदय चौधरी यांनी या सर्व प्रकरणांमध्ये रीतसर नोटीस देऊन, प्रकरणात रीतसर सुनावणी घेतली व संबंधित सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचीसुद्धा बाजू ऐकून घेतली. त्यानुसार त्यांनी सर्व प्रकरणांमध्ये उपलब्ध पुरावे व माहितीनुसार कायदेशीर कारवाई करून अंतिम निर्णय घेणे आवश्यक होते. पण जिल्हाधिकारी (लोकसेवक) श्री उदय चौधरी यांनी प्रकरणात कसलाही अंतिम निर्णय ब देता प्रकरणे प्रलंबित ठेवल्याने, तक्रारदारांनी त्याच्यावर आरोप केला कि, त्यांनी जाणीवपूर्वक तसे न करता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी आर्थिक संगणमत करून, त्यांच्या भ्रष्टाचाराला अभय देऊन, त्यांची पाठराखण करून, आमच्या प्रकरणांमध्ये कोणताही अंतिम निर्णय पारित न करता त्यांची इतर ठिकाणी त्यांनी बदली करून घेतली. त्यांच्या या बेजबाबदार व भ्रष्ट कृत्यामुळे सरळ-सरळ आमची फसवणूक झाली असून, हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही विविध आरोप निश्चित करून, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी मा. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या समोर शासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. सिल्लोड नगर परिषद प्रशासनाच्या कित्येक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये लेखी पुरावे सादर करून सुद्धा, कागदोपत्री त्यांच्या निदर्शनास आणून देऊन देखील, त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणात वेळोवेळी तब्बल पाच (५) वेळा विशेष चौकशी समिती स्थापन करून ही, त्यामध्ये कोणतीही अंतिम कार्यवाही/ कारवाई केलेली नाही. तसेच त्यामध्ये कोणताही अंतिम निर्णय पारित केला नाही, त्याअर्थी हे स्पष्ट आहे की, संबंधित भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत त्यांचे आर्थिक लागेबांधे आहेत. सध्या जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रादुर्भाव असल्याकारणाने मा. पोलीस निरीक्षक बेगमपुरा पोलीस ठाणे यांनी सध्या धारा 144 लागू असल्याकारणाने आपणास परवानगी देता येणार नाही असे उपोषणकर्त्यांना तोंडी कळवले. त्यामुळे सर्व उपोषणकर्त्यांनी मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना यांनी दिलेल्या तब्बल ४९ निवेदनानुसार व सदर तक्रार नुसार, तत्कालीन जिल्हाधिकारी व महाराष्ट्राचे उपसचिव (लोकसेवक) श्री उदय चौधरी यांच्यावर केंद्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (Anticoruption Act) 1988 व सुधारित अधिनियम २०१८ मधील तरतुदी/ नियमानुसार, खोटी कार्यवाही करून दिशाभूल करून, आमची फसवणूक करणे 420, ४०६, ४०८, ४०९, ४१७, ४१८, ४१९, ४६५, ४६६, ४७०, ४७१ section of ipc नुसार, IPC Section 166A आणि १६७, १७७, १८२, १९३, १९६ २०१, २१७, २१८ नुसार, सिल्लोड शहरातील अवैध प्लॉटिंग व बांधकाम त्यांना अभय देऊन, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्या प्रकरणी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ व नगर रचना अधिनियम १९६६ कलम मधील कलम ५६ अ ची अवहेलना/ पायमल्ली व कर्तव्यात नुसार, तसेच योग्य कायदा, अधिनियम, कलम, नियम/ तरतूद, महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी पारित केलेली अध्यादेश, परिपत्रक, आदेश आणि मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय यांचे वेळोवेळी पारित केलेले आदेश/ मार्गदर्शक निर्देश नुसार त्यांच्यावर योग्य गुन्हा नोंद करून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी दिनांक १४/०९/२०२० रोजी लेखी तक्रार मा. पोलीस आयुक्त निखील गुप्ता IPS औरंगाबाद यांच्याकडे महेश शंकरलाल शंकरपेल्ली, ॲड. शेख उस्मान शेख ताहेर, मनोज गंगाराम मोरेल्लु, किरण छगनराव पवार, अमोल अशोकराव ढाकरे, शेख रफिक शेख रहीम, मधुकर आनंदराव राऊत पाटील, इमरान अब्दुल कलीम देशमुख, इस्माईल शेख सलीम शेख, विनोद अशोक पगारे, असलम खा जुम्मा खान पठाण, शेख फिरोज शेख अकबर, शेख मुख्तार सादिक बबलू शेख, गणेश शंकरलाल शंकरपेल्ली, अंकुश दादाराव पाटील, मुस्ताक मनवर खान मेवाती, सद्दाम हुसेन मुलतानी, देवानंद चित्राल, अंबड, आसिफ खान, औरंगाबाद, अजहर अन्वर सय्यद, फुलंब्री, रघुनाथ दादा राकडे, कासोद, सांडू अण्णा पुंगळे, उपळी, आशाबाई धोंडू बोराडे, प्रभाकर केशवराव दापके, सज्जाद मुक्तार देशमुख, शेख ताहेर शेख महेबुब, शुभम पंडित तायडे, गंगाबाई लालसिंग करघे, गुलाबसिंग देवचंद करघे आदी तक्रारदारांनी दिली आहे.
सदर संपूर्ण आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व समाज सेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच आम आदमी पक्षाचे सिल्लोड सोयगाव विधानसभा अध्यक्ष श्री. महेशकुमार शंकरपल्ली यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें