सिंचण विहिर व ग्राम विकास निधीत सरपंच व ग्रामसेवक ने केला अपहरत व्यवहार ग्रामस्थानी केली तक्रार,प्रशासनिक चौकशीला प्रतिसाद देत नसल्याचे सेलु तालुक्यातील कुपटा येथील प्रकार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 2 अगस्त 2020

सिंचण विहिर व ग्राम विकास निधीत सरपंच व ग्रामसेवक ने केला अपहरत व्यवहार ग्रामस्थानी केली तक्रार,प्रशासनिक चौकशीला प्रतिसाद देत नसल्याचे सेलु तालुक्यातील कुपटा येथील प्रकार.


तेज़ज़न्युज़24, संपादक.दि.02/08/2020.
सेलु तालुक्यातील कुपटा या गावातील जागृत ग्रामस्थांनी दि.08/06/2020 रोजी एका निवेदनाद्वारे उपमुख्य कार्यकारी आधीकारी (ग्रा.प)जि.परिषद परभणी यांना कुपटा येथील सरपंच यांनी सिंचण विहिर गावठाण हद्दित न करता गावाबाहेर त्यांच्या स्वत:च्या शेतात करत आहे व सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने इस.2018-19 व 2019-20 या वर्षातील तब्बल 30 ते 32 लक्ष  विकास निधी गावात काम न करता भ्रष्टाचार करुन हळप केल्याची तक्रार केली व या तक्रारीवर योग्य ती कार्यवाहि न झाल्यास उपोषणाचा ईशारा‌ देण्यात आला.
 या निवेदनाची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी पंचायत समिती सेलु यांना या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले व दिलेल्या आदेशानुसार प.स.सेलु येथील गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी (पं) पंचायत समिती सेलु यांना चौकशीचे आदेश दिले व विस्तार अधिकारी यांनी कुपटा येथील ग्रामसेवक यु.ए.नागरे यांना तक्रारीच्या चौकशी संबधी तोंडि व लेखी सुचणा देऊन हि त्यांनी तक्रारी मध्ये उल्लेख असलेल्या 14 वा वित्त आयोग,एमएआरईजिएस, अंतर्गतची सार्वजनिक सिंचण विहिर, मासिक सभा,ग्रामसभा,यांचे अभिलेखे दि.03/07/2020 रोजी पर्यंत सादर केलेले नसल्याचा पंचनामा संबंधित विभागाला सादर केलेला असुन गटविकास अधिकारी (पं)पंचायत समिती सेलु यांनी सदर प्रकरणात मौजे कुपटा येथील  कार्यरत ग्रामसेवक यु.एन.नागरे हे चौकशीला प्रतिसाद देत नसल्याचे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना दि.21/07/2020 रोजी सादर केले आहे.जिल्हा प्रशासनाने संबधीत प्रकरणाची सखोल चौकशी करुन झालेल्या अपहरत व्यवहारातील दोषींवर कडक कार्यवाहि करण्याची मागणी ग्रामस्थाकडुन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें