स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षाला जिवे मारण्याची धमकी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 अगस्त 2020

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षाला जिवे मारण्याची धमकी.

बोरी पोलीसांकडे कारवाई करण्याची मागणी.
Tezznews24, parbhani news

तेज़्ज़न्युज़24, संपादक (अनवर पठाण)दि.06/08/2020.
जिंतुर तालुक्यातील पिंपरी रोहिला येथील रहिवासी आसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिंतुर तालुकाध्याक्ष शेख इरशादपाशा शेख चाॅदपाशा यांना दिनांक 5 अगस्त रोजी सांयकाळी अंदाजे 6:30 वाजता मयूर वसमतकर राहणार पिंपरी रोहिला या व्यक्तीने दूरध्वनीवर संपर्क साधून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शेख इरशादपाशा यांनी बँकेत कर्जा बाबतीत शेतकऱ्यांची दलालांकडून आर्थिक लूट होत आहे हा प्रकरण उचलून धरला असता याच प्रकरणातील एका दलालाकडून तू शेतकऱ्यांची बाजू का घेत आहे म्हणून इरशाद पाशा यांना फोनवर घाणेरड्याभाषेत शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे धमकी देणाऱ्या व्यक्तीची तक्रार बोरी पोलिसात अर्जाद्वारे देण्यात आली असन या व्यक्तीवर पोलिसांची काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें