9 वर्षानंतर येलदरी धरणाचे 2 दरवाजे उघडले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 12 अगस्त 2020

9 वर्षानंतर येलदरी धरणाचे 2 दरवाजे उघडले.


जिंतूर / प्रतिनिधी.

खडकपूर्णा धरणातील विसर्गात वाढ झाल्याने येलदरी धरणाच्या साठ्यातही वाढ झाली असल्यामुळे आज बुधवार दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. 9 वर्षापासून येलदरी धरणात फक्त मृतसाठाच उपलब्ध होता. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खडकपूर्णाच्या धरणातून पाणी सोडण्यात आले होते.  तरीही येलदरी धरणात पुन्हा साठवण करण्याची क्षमता  असल्याने येलदरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते. परंतू मागील काही दिवसांपासून  खडकपूर्णाच्या धरणातील पाणी सोडण्यात येत असल्याने येलदरी धरणात क्षमतेपेक्षा जास्त आवक होत असल्याने आज दुपारी दोन दरवाजे उघडण्यात आले. अनेक वर्षापासून जिंंतूरकरांना गेट उघडण्याची प्रतीक्षा होती. आज जिंतूकरांनी मनमोहक दृश्याचा आनंद घेतला. 50 सेमी एवढे दरवाजे उघडण्यात आले. त्यातून 4 हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. परिसरातील जनतेने या क्षणाचा आनंद घेतला. याठिकाणी आज झालेली लोकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें