राजगृहावर हल्ला करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी व आंबेडकर घराण्याला झेडप्लस सुरक्षा देण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 8 जुलाई 2020

राजगृहावर हल्ला करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी व आंबेडकर घराण्याला झेडप्लस सुरक्षा देण्याची मागणी.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करावी तसेच आंबेडकर घराण्याला झेड प्लस सुरक्षा पुरविणे बाबत तहसीलदार पाथरी यांना वंचित बहुजन आघाडी पाथरी च्या वतीने निवेदन देन्यात आले .
राजगृहावर ज्या माथे फिरुनी हल्ला केला आहे.तो हल्ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या घरावर केला नसून तो संबध आंबेडकरी समाजावर हल्ला केला आहे.
ज्या राजगृहाशी आमची अस्मिता व अस्तित्व जोडले गेले आहे ते अस्तित्व व अस्मिता संपवण्याचा डाव काही लोक,जातीयवादी संघटना माथेफिरू च्या हातून करून घेत आहे.यांचा करविता धनी जो कुणी असेल त्याला सरकारने त्वरित अटक करावी.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने आरोपीना तात्काळ अटक करून या माथे फिरूनच्या मागे असलेल्या बोलवित्या धण्याचा ,संघटनेच्या मुसक्या आवळून जनतेसमोर जाहीर करावे,तसेच आंबेडकर घराण्याला झेड प्लस सुरक्षा पुरवावी जेणेकरून समस्त आंबेडकरी जनतेच्या मनातील उद्रेक थांबेल अशा विविध मागण्यांचे निवेदन आज वंचित बहुजन आघाडी तालुका पाथरी च्या वतीनेच माननीय तहसीलदार यांना करण्यात आले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें