सेलू (तेज़ज़न्युज़24) अनवर पठाण.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मा. जिल्हाधिकारी परभणी यांनी सेलू शहरातील सर्वच व्यापारींची रैपिड अँटिजन टेस्ट करण्याचे ठरविले आहे.
रैपिड अँटिजन टेस्टचे परीणाम हे बरेच प्रमाणात चुकीचे निघत असल्याबातची चर्चा विविध प्रसार माध्यमाद्वारे ऐकावयास मिळत अाहे.
या रैपिड अँटिजन टेस्टच्या चुकीच्या निष्कर्षाच्या अनुषंगाने बरेच व्यापारी धास्तावले आहेत. शहरात हातगाड्यावर व इतर पध्दतीने व्यापार करणारे अनेक छोटे व गोर गरीब व्यापारी आहेत. चुकीच्या निष्कर्षामुळे अनेक व्यापारी कुटूंबाना कॉरंटाईन होण्याची वेळ येऊ शकते, परीणामी त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागेल.
करीता सेलू शहरात सर्व व्यापारींची रैपिड अँटिजन टेस्ट न करता प्रशासनाने रैपिड अँटिजन टेस्ट करण्याबाबत जाहीर आव्हान करावे. ज्यांना शंका वा आवश्यकता वाटेल ते स्वत:हुन टेस्ट करुन घेतील या आशयाचे निवेदन उपजिल्हाधिरी मार्फत मा. जिल्हाधिकारी, परभणी यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर नगरसेवक सर्व श्री शेख रहीम, अविनाश शेरे, विठ्ठल काळबांडे, शेख आय्युब भाई, कासिम भाई, अजिम कादरी, युथ फोरमचे शेख अमजद बागवान, शेख साजीद, मुताहेर पठाण, करीम खान अदिंची स्वाक्षरी आहे.
निवेदनाच्या प्रती उपजिल्हाधिकारी सेलू, तहसिलदार सेलू, जिल्हा शल्यचिकीत्सक परभणी, वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय सेलू यांना देण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें