विद्यार्थी वाचवा संघटनेच्या महाराष्ट्र राज्यप्रसिध्दीप्रमुखपदी योगेश मोरे; प्रदेशउपाध्यक्षापदी ऐश्वर्या नाईक यांची निवड
विद्यार्थ्यांच्या हितासाठी व हक्कासाठी विद्यार्थी वाचवा संघटनेची स्थापना करण्यात आलेली असून,आजपर्यत व्यावसायिक व अव्यावसायिक परिक्षा रद्द करणे, विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अशी यशस्वी वाटचाल संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. विद्यार्थी वाचवा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुखपदी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, गीतकार,संगीतकार, कथा पटकथा लेखक योगेश तुळशीराम मोरे यांची निवड करण्यात आलेली असून,तसेच प्रसिद्ध लेखक योगेश मोरे यांना मराठी साहित्यलेखन कलेची आवड असून, लेखक योगेश मोरे यांनी "भरकटलेल्या पक्ष्याचा किलबिलाट"ही मराठी कादंबरी लिहिलेली असून,याच कादंबरी ला संपूर्ण महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला आणि हीच कादंबरी वाचकांच्या सोयीसाठी इंग्रजी भाषेत "द श्रील चर्प ऑफ अ लॉस्ट बर्ड"या नावाने अमेझॉनवर देखील उपलब्ध करून दिलेली असून, या कादंबरीवर आधारित लवकरच एक धमाल मराठी विनोदी चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध सिनेअभिनेते संजय यु.पाटील करणार आहेत.तसेच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय कब्बड्डीपटू तथा नृत्य अभिनेत्री ऐश्वर्या विलास नाईक यांची महाराष्ट्र राज्यप्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते विद्यार्थी वाचवा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा व युवती सेलअध्यक्षा पदी निवड करण्यात आलेली असून,महाराष्ट्र राज्यप्रसिद्धी प्रमुख योगेश मोरे व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा ऐश्वर्या नाईक यांनी निवडीच्यावेळी विधान केले की,आम्ही सत्याच्या मार्गावरून संघर्ष करून सन्मानजनक स्थान प्राप्त करण्यासाठी आम्ही स्वतः व विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सद्स्य सदैव कटिबध्द आहोत,असे विधान केले.विशेष म्हणजे ऐश्वर्या नाईक यांची सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय कबड्डी संघात सलग पाच वर्षे ऐश्वर्या नाईक यांनी कबड्डी संघाचे नेतृत्व केले.तसेच विद्यार्थी वाचवा संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख योगेश मोरे व प्रदेश उपाध्यक्षा ऐश्वर्या नाईक यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौरभ नवले,ओंकार कोकरे प्रदेश कार्याध्यक्ष, किरण घोडके प्रदेश संघटक तथा मुख्य प्रवक्ते,प्रदेश सचिव रोहन येळवे,प्रदेश कोषाध्यक्ष प्रसाद वाक्षे,सौरभ पाटील प्रदेश सरचिटणीस,प्रदेश संपर्कप्रमुख रोहित सूर्यवंशी,प्रदेश अध्यक्ष किरण असवले आदींनी राज्यप्रसिद्दीप्रमुख योगेश मोरे व प्रदेश उपाध्यक्षा ऐश्वर्या नाईक यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें