पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबविण्याची मागणी.जिंतूर च्या पत्रकार संघाकडून गृहमंत्री यांना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 9 जून 2020

पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबविण्याची मागणी.जिंतूर च्या पत्रकार संघाकडून गृहमंत्री यांना निवेदन.


प्रतिनिधी.जिंतुर:-दि.09/06/2020.
समाजात घडणाऱ्या लहान मोठ्या घटना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत असल्याने जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाकडून गृहमंत्री यांना दि ९ जून रोजी तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
जिंतूर येथील तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार सुरेश शेजुळ यांना दिलेल्या निवेदनामध्ये सेलू येथील पत्रकार मोहन बोराडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसेच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली.
राज्याचे गृहमंत्री यांनी पोलिस प्रशासनाला तात्काळ व कठोर कार्यवाही करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी देखील संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करताना केली.
या निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी, कार्याध्यक्ष शहजाद पठाण, सचिव गुणीरत्न वाकोडे, एम ए माजिद, प्रदीप कोकडवार तसेच तालुक्यातील बहुसंख्य पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

*नसता पुढील दिशा ठरवु*
_सेलू येथील पत्रकार हल्ल्याच्या घटनेमध्ये समाधानकारक कार्यवाही न झाल्यास लवकरच सेलू व जिंतूर चा पत्रकार संघ सामुहिकरित्या पुढील दिशा ठरवणार असल्याची प्रतिक्रिया गजानन चौधरी यांनी दिली._

तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मा. तहसीलदार यांना सेलू येथील पत्रकार हल्ल्याच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी, कार्याध्यक्ष शहजाद पठाण, सचिव गुणीरत्न वाकोडे व इतर दिसत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें