सर्व दिवस हे महिला दिवस म्हणून साजरा करा. तिचा आदर तिचा सन्मान हा फक्त एक दिवसा पुरता न करता रोज करा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 मार्च 2020

सर्व दिवस हे महिला दिवस म्हणून साजरा करा. तिचा आदर तिचा सन्मान हा फक्त एक दिवसा पुरता न करता रोज करा.

दि.07/03/2020.
मला वाटतं सर्व दिवस हे महिला दिवस म्हणून साजरा करा. तिचा आदर तिचा सन्मान हा फक्त एक दिवसा पुरता न करता रोज करा.
  माझी आई,माझी बहिण,माझी वहिनी आणि माझ्या मैत्रिणी या माझ्या जीवनातील महत्वाच्या महिला आहेत. ज्यांनी मला केवळ एक चांगली व्यक्तीचं बनवलं नाही तर माझ्या कठीण काळात माझं समर्थन ही केलं.
    दर वर्षी 8 मार्चला साजरा करणारा जागतिक महिला दिवसाचा महत्व वर्षानुवर्ष वाढत चालला आहे.आणि आज ते एका प्रकारची रित बनून गेली आहे.हे महिलांच्या प्रती एक मानसन्मान,कौतुक,प्रेम आणि आदर दर्शविण्याची एक संधी आहे.आपल्याला हे जाणून खूप आनंद होईल की,आजकाल महाविद्यालय,शाळा मध्ये ही महिला दिवस साजरा केला जात आहे.जे युवकांच्या मनात  त्याना लहानपणापासूनच महिलांच्या प्रती सन्मान,आदर आणि त्यांची देखभाल करायला शिकवत आहे.विशेष म्हणजे काही शाळेत महिलांचं सशक्तीकरण, समाजात त्यांची स्थिती आणि त्यांच्या यशाचं ज्ञान आणि जागरूकता पसरविण्यात पाठ्यपुस्तकाचा एक अनिवार्य भाग आहे.
     समाजातील महान महिलांचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिवस हा पूर्ण जगात साजरा केला जातो.लिंग समानता आणण्यासाठी महिलांचा सशक्तीकरण खूप महत्त्वाचा आहे.त्या समाजाचा विकास खूप चांगला होतो जिथे महिलांना समान वागणूक आणि सन्मान दिलं जातो.बहुतेक जुन्या पारंपरिक लोकांना अजूनही असं वाटत की,महिलांना घर कामा पर्यंतच मर्यादित ठेवलं पाहिजे आणि बाहेरच्या कामात त्यांचे पाऊल सुध्दा पडू देऊ नये.कारण की ते त्यांचं कार्य क्षेत्र नाही.
   एक महिला होण्याच्या नात्याने महिला साठी एक खास दिवस असायला पाहिजे असे मला वाटते.जिथे तिचा कौतुक,मान सन्मान केला जाईल.परंतु मला वाटतं की महिलांचा मानसन्मान फक्त महिला आहे म्हणून केलं नाही पाहिजे तर यामुळे केलं पाहिजे की तिची स्वतःची आपली एक वैयक्तिक ओळख आहे,ती समाजाच्या भल्यासाठी तितकंच योगदान करते.इथे मी थोडी पक्षपाती बनेल मी म्हणल की जर पृथ्वी वर कोणतीच महिला वाचली नाही तर मानव जातीचा अस्तित्व समाप्त होऊन जाईल.कारण ती एक स्त्रीचं आहे जी धरतीवर जीवन घेऊन येते. प्रत्येक महिला ही विशेष आहे.मग ती घरी असो की कार्यालय मध्ये काम करत असो ती आपल्या मुलांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते.आणि आपल्या घराला ही कार्यक्षमतेने व्यवस्थापित करते.
 आजची महिला ही एका कोणावर अवलंबून राहत नाही तर ती आत्ता स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण आहे.व सर्व काही करण्यात ती सक्षम आहे.म्हणून मी असच म्हणेल की तिच्या अस्तित्वाच महत्व ओळखा आणि भावी यश मिळविण्यासाठी तिला प्रेरणा द्या.
  - शेख समिना अब्दुल रौफ
   Writer and Editer
    

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें