हजरत टिपू सुलतान यांच्या 269 व्या जयंती निमित्त मंठ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 21 नवंबर 2019

हजरत टिपू सुलतान यांच्या 269 व्या जयंती निमित्त मंठ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

मंठा/ प्रतिनिधी:- दि.20/11/2019.
  शहरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपल्या देशाची शान हजरत टिपू सुलतान रह. यांच्या 269 व्या जयंतीनिमित्त टिपू सुलतान युवा मंचातर्फे अमन कॉम्प्लेक्स ऊस्वद रोड येथे 20 नोव्हेंबर 2019 बुधवार रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात जवळपास ३५ युवकांनी आपले रक्तदान केले. तसेच जिल्हा उप रुग्णालय येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
        कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक निकम , तर उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ‌. चाटसे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून . नगराध्यक्ष नितिन राठौड़, उपनगराध्यक्ष सिराज, खान , इसाम पटेल,  कयूम कुरेशी , जलील शेख ,  शबाब कुरैशी, सय्यद इरफाम आली,  चाँदपाशा बागवान ,मूसा कुरेशी , इलियास  कुरैशी, मुस्तफा पठान ,शेख एजाज  ,अंकुश नाना मोरे ,डॉ.भारत खंदारे , ॲड .मधुकर  मोरे, ॲड  मस्के  , पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष दायमा, नागेश कुलकर्णी,
 खलील पाशा अन्सारी, शिवाजी जाधव ,कबीर  तंबोली,डॉ नासेर चौधरी, शगिर खान , सादेक बागवान, हाफिज जब्बार साहब यांची उपस्थिती होती..

   आलेल्या प्रमुख पाहुण्यांना फुलाचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .त्यानंतर रक्तदान शिबिराची सुरुवात झाली.रक्त संकलनासाठी एसबीटीसी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या डॉ. सौ.रुबिका मुस्तफा ओसवी, व जिल्हा शाळेचे  धोत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रक्तदान शिबिर घेतली गेली.

    रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी मोसिन कुरेशी, इस्माईल राज, मोसिन मिस्बाह, मुस्तकीम कुरैशी, इमरान मनियार,यूनुस कुरैशी, साजिद पिंजारी, अनस शेख, इमरान तंबोली, जावेद पिंजारी, जावेद डेनी, अलीम कुरैशी, वसीम शेख,आरिफ कुरैशी, यांच्यासह टिपू सुलतान युवा मंचचे  कार्यकर्ते व पदाधिकारी व  सदस्य यांनी मोलाची कामगिरी बजावून रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडली.
या शिबिरात सर्व समाजातील युवकांनी आपला सहभाग नोंदवून रक्तदान शिबिर संपन्न झाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें