मंठा प्रतिनिधी :
इस्लाहे माआशेरा फाउंडेशन पुणे शहर चे संस्थापक व अध्यक्ष सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व निर्भय निडर प्रवक्ते मा. हजरत मौलाना अकबर हाश्मी , मंठा शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे मंठा नगरीत राजकीय मंडळी तसेच ओलेमा व हुफ्फाज ईकराम यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आले.
यांच्यासहित औरंगाबाद शहराचे नामांकित उद्योजक जब्बार सेठ बागवान , यांचेही याप्रसंगी सत्कार करण्यात आले.
मौलाना हाश्मी यांनी इस्लाहे माआशेरा फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यभरात वेगवेगळ्या समाजात समाज सुधारणांची कामे व विविध उपक्रम राबविण्यची मोहीम हाती घेतली आहे.
त्यातील एक उपक्रम वयोवृद्ध म्हणजे ज्यांनी आपल्या आयुष्यातील वयाचे वीस पंचवीस वर्ष केवळ लोकांची सेवा करण्यासाठी घालवला आहे. असे वयोवृद्ध गटातील विद्वानांसाठी फाउंडेशनच्या माध्यमातून दर महिने दोन हजार रुपये पेन्शन देण्याचा आदर्श स्थापित केले आहे . एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते मंठा शहराच्या दौरावर आले होते. शहरात त्यांच्या ठीक ठिकाणी नागरिकांच्या वतीने सत्कार करून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मुफ्ती इरफान मिल्ली , हाफेज शबाब ईनायती काशफी , हाफीज साकिब अहमद , मौलाना अहद , हाफीज शाकीर ,मौलाना वसीम, मौलाना अबुल कलाम उर्दू महाविद्यालयाचे अध्यक्ष ईसामुद्दीन पटेल, ताजुद्दीन भाई , सय्यद इरफान अली, शेख इमरान ,जावेद पटेल , व इतर उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें