आधुनीक उपचारपद्धतीने पांढरया कोडाचे उच्चाटन करता येते - डॉ. संजय जोगड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 15 जुलाई 2019

आधुनीक उपचारपद्धतीने पांढरया कोडाचे उच्चाटन करता येते - डॉ. संजय जोगड.

सेलूत शालेय पोस्टर  स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांचा सहभाग(जागतिक कोडदिनानिमीत्त उपक्रम) 


सेलू प्रतिनिधी


 सेलू पांढरा कोड हा त्वचेचा आजार आजच्या आधुनिक उपचार पद्धतीने पुर्णपणे बरा करता येतो. परंतु अंधश्रद्धा आणि गैरसमजामुळे भारतीय समाजमनावरही प्रबोधनाच्या माध्यमातून उपचार करणे आवश्यक आहे तरच पांढरयाकोडाचे समुळ उच्चाटन होईल असे विचार प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ संजय जोगड यांनी मांडले.
       येथील इंडीयन असो.ऑफ डरमँटोलॉजीस्ट व्हेनेरोलॉजीस्ट अँन्ड लँप्रोलॉजीस्ट शाखा परभणी,हिंगोली,नांदेडच्या वतीने रविवार दि15 जुलै रोजी जागतीक कोडदिनानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून रामपालजी मालाणी, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ दिनेश भुतडा, डॉ.महारुद्र भोसले, डॉ शरद माने, डॉ सुमीत अग्रवाल ,संयोजक डॉ शैलेश मालाणी यांची उपस्थिती होती. सकाळी 11-00 वा. येथील न.प.च्या योगा हॉल मध्ये आयोजीत पोस्टर्स प्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ सत्यनारायण लोया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ जनार्धन गोळेगावकर, डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, डॉ.भागचंद मालाणी,शिवनारायण मालाणी,डॉ सुदर्शन मालाणी, आनंद मालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या पोस्टर स्पर्धेत शहरातील १५ शाळेतील ३५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजयश्री गाडेकर,शेख आलीना,शेख रमैसा,वैष्णवी चव्हाण,श्रुती कुलकर्णी,श्रृष्टी खरात,यश जाधव,अभिजीत पावडे,ऋषभ कान्हेकर,श्रुती डहाळे,फातेमा सिद्दीकी,संजना तालडे यांच्यासहलएकुण 37 विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, शालेय साहीत्य व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवुन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शैलेश मालाणी सुत्रसंचालन सुभाष मोहकरे, भगवान पावडे, योगेश ढवारे ,शकुर गरूजी,श्याम बारसकर यांनी परीक्षण केले,तर श्रीमती शर्मीला मालाणी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबासाहेब हेलसकर,शेख मुनीर, सुर्यकांत जाधव, हितेश शहा, रेवा कंदनानी, ईश्वर जैन,प्रनव भुतडा,संतोष गजमल, परमेश्वर वरकड, नारायण वरकड, चौधरी आदींनी परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें