सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील वाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पामुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून सेलू शहराला पाणीपुरवठा होत असल्यामुळे सेलू शहराची पाणीटंचाई बंद झाली होती मात्र सेलू नगर परिषदेच्या नियोजनाअभावी दोन महिन्यापासून सेलु शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे सेलू नगर परिषदेकडून भोंगा फिरवून सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात शहरातील राजीव गांधी नगर सुरज मोहल्ला राज मोहल्ला दत्तनगर गीसेखा नगर आठवडी बाजार मारवाडी गल्ली रहमान नगर मसोबा चौक स्टेशन रोड आदी भागात गेल्या नऊ दिवसाआड पाणी सुटते त्या मुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ आली आहे
गेल्या वर्षभरात सेलु शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत होता दरम्यानच्या काळातच नगर परिषदेने पूर्ण वर्षाचे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते मात्र इतर ठिकाणी ज्यात पैसे खाता येतात अशा प्रकरणात कडेच सर्वांचे लक्ष असते त्यामुळे नागरिकांच्या सुखसोयी कडे लक्ष देणे होत नाही त्याचा परिणाम अत्यावश्यक सेवा पैकी पाणीही ही अत्यंत गरजेची गोष्ट असून प्राधान्याने नागरिकांना पाणी टंचाई भासू नये याकरिता वेळ मिळत नाही ही जिल्ह्यात इतरत्र फार मोठ्या प्रमाणात भीषण पाणीटंचाई असल्यामुळे सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी उन्हाळ्यात शेवटी परभणी करांना धरणातून पाणी सोडण्यात आले त्यामुळे सेलू करांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे वास्तविक पाहता सुरुवातीपासूनच नियोजन केले असते तर सेलू शहराला आज जी भीषण टंचाई भासत आहे ती वेळच आली नसती
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आन शाळाही सुरू झालेले आहेत मात्र पिण्याच्या पाण्याकरिता विद्यार्थ्यांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे त्यात केवळ भोंगा फिरून नागरिकांना कळवले मात्र त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे तरी नगरपरिषदेने गरजू नागरिकांना टॅंकरद्वारे पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें