सेलू प्रतिनिधी
सेलू : येथील कवी प्रा.डाॅ. अशोक पाठक यांच्या पक्षी उडून जातात या कविता संग्रहास जीवन गौरव मासिक महाराष्ट्र संलग्न शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा जीवन गौरव उत्कृष्ट साहित्य पुरस्कार पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवार दि.०५ रोजी रामशेज, नाशिक येथे संपन्न झालेल्या दुसय्रा शिक्षक साहित्य संमेलनात शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चास्कर,शिवराम बोडखे,वैशाली भामरे,रत्ना चौधरी, डी.बी.शिंदे, रामदास वाघमारे यांची उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्या बद्दल मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कपील आकात, प्राचार्य डाॅ.भगवान दिगंरे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा.नागेश कान्हेकर, सुरेश हिवाळे ,शरद ठाकर,दिगंबर रोकडे यांनी अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें