पंधरा लाखाची चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनावर उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांची कारवाई. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 28 मई 2019

पंधरा लाखाची चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनावर उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांची कारवाई.


सेलू प्रतिनिधी समशेर खान


पाथरी तालुक्यातील मुदगड पाथरी तालुक्यातील मुदगल येथील वाळू घाटाची अचानक तपासणी करण्याकरता जातेवेळी पाथरी पोखरणी रोड वर रेनापुर शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करताना विना पावती सहा वाहने आढळून आल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली असून अंदाजे पंधरा लाख रुपयाचा महसूल बुडवल्याची दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दाखवण्यात आले आहे

याबाबतचे वृत्त असे की जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू येथील उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह पाथरी तालुक्यातील मुद्गल येथील वाळू घाटाची अचानक तपासणी करण्यासाठी जातेवेळी पाथरी पोखरणी रस्त्यावर वाळूची चोरटी वाहतूक करत असलेली सहा मोठी हायवा टिप्पर आढळून आल्यामुळे उमाकांत पारधी यांनी सदरील वाहनांची तपासणी केली असता संबंधित वाहन चालका जवळ रेती वाहतुकीचे कुठलीही पावती नव्हती या सहाही हायवा टिप्पर मध्ये जवळपास पंधरा लाख रुपयाची वाळू आढळून आली असून यावेळी त्या वाहनासोबत असणाऱ्या दोन संशयित खबऱ्यांना पोलिसांच्या हवाली करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे त्यांच्यावर पाचवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

सदरील पकडलेल्या वाहनांमध्ये mh20 टीसी 57 50 एम एच 12 डी 597 एम एच बारा डी टी 80 79 mh22 एम  14 41 एम एच 0 4 यु एल 14 48 एम एच 04 झीयू 89३ या सहा वाहनांमधून वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत होती पंधरा लाख रुपयाच्या वाळूची चोरटी वाहतूक करणारी व त्यावर कार्यवाही होणारी एवढ्या मोठ्या प्रमाणात तील ही पहिलीच वेळ असून कार्यवाही करण्यात आलेल्या पथकात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अनंत शहाणे शरद मगर सचिन गायकवाड मनोहर चींचाने रघुनाथ गावडे आदींचा समावेश होता

सध्या सेलू पाथरी पूर्णा परभणी अधिकारी फार मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत असून त्यावर अंकुश घालण्यासाठी महसूलचे अधिकारी प्रयत्न करत आहेत मात्र यापेक्षाही मोठ्या प्रमाणात याबाबतची मोहीम राबविण्यात यावी तसेच वाळू तस्कर आवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून करण्यात येत आहे मात्र महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे मात्र अशाप्रकारे केलेल्या कार्यवाहीमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें