जिंतूरात गुलाम नबी आझाद उर्दु शाळेच्या मुख्याध्यापिकेची मनमानी ; गुणपत्रिका देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनी कडून उकळले दहा रुपये . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 मई 2019

जिंतूरात गुलाम नबी आझाद उर्दु शाळेच्या मुख्याध्यापिकेची मनमानी ; गुणपत्रिका देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनी कडून उकळले दहा रुपये .


जिंतूर /प्रतिनिधी

 1 मे रोजी झेंडावंदन झाल्यानंतर राज्यातील सर्वच मराठी,उर्दू,हिंदी,इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पहिली ते नववी पर्यंतच्या वर्गात शिक्षण विद्यार्थ्यांना वार्षिक निकाल पत्र देण्यात येते.शहरातील गुलाम नबी आझाद उर्दु कन्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने मात्र आपली मनमानी करत शाळेतील प्रत्येक विद्याथीनिकडून गुणपत्रिका देण्याच्या गोंडस नावाखाली दहा रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की शहरातील भाजी मंडई परिसरात गुलाम नबी आझाद उर्दु कन्या शाळा आहे या कन्या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असून यामध्ये साडेचारशे विद्यार्थीनि आज मीतीस शिक्षण घेत आहे या शाळेचा वार्षिक निकाल दि 1 मे रोजी जाहीर करण्यात आला यामध्ये पाचवी ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थिनी कडून दहा रुपये याप्रमाणे तर वर्ग नववीच्या प्रत्येक विद्यार्थिनी कडुन प्रति विद्यार्थिनी 15 रुपये या प्रमाणे गुणपत्रिका देण्यासाठी रक्कम आकारण्यात आली ज्या विद्यार्थिनीनि घरून येताना आपल्या सोबत पैसे आनले नव्हते अशा विद्यार्थिनींना झेंडावंदन झाल्यानंतर आल्या पावली घरी परत पाठविण्यात आले व घरून रक्कम घेऊन आल्यानंतरच त्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या मुख्याध्यापिकेच्या या मनमानीला पालक वर्ग कंटाळला असून सदरील शाळा शंभर टक्के शासकीय अनुदानावर असून सुद्धा गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थिनीकडून 10 ते 15 रुपये कशाला आकारले ? हा प्रश्न पालकातून व्यक्त होत आहे आर टी ई कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शासनाने शिक्षण सक्तीचे व मोफत केले असून या नियमा नुसार अनुदानित शाळेत विद्यार्थ्यांकडून कोणतीही रक्कम घेता येत नाही तसेच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न देता विध्यार्थी संचिका देणे बंधनकारक असतानाही सदरील शाळेने गुन पत्रकाचे पैसे कसे काय  घेतले हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे या सर्व प्रकाराला शिक्षण विभागाची मूक संमती तर नाही? असा प्रश्न पालकानां पडला आहे जर संमती नसेल तर मग शिक्षण विभाग या शाळेच्या मुख्याध्यापिका वर कोणतीही कारवाई करतो हे पाहणे क्रमप्राप्त ठरेल
विद्यार्थिनी कडून उकळले हजारो रुपये या शाळेत पहिली ते आठवी वर्गा पर्यंत साडेतीनशे विद्यार्थिनी व  नववी वर्गात 100 विद्यार्थिनी असे मिळून एकूण साडेचारशे विद्यार्थिनी शिक्षण घेत असून या सर्व विद्यार्थ्यांकडून मिळून मुख्याध्यापिका रुकसाना बेगम यांनी एकूण तब्बल पाच हजार रुपये एका दिवसात उकळले आहेत हा प्रकार गेल्या आठ ते दहा वर्षापासून सुरू असून ही मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनी कडून उकळलेली रक्कम परत घेऊन ती विद्यार्थ्यांना परत करावी अशी मागणी पालक निशाद अहेमद यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यां मार्फत शिक्षणमंत्री,शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे  

मुख्याध्यापिकेच्या आदेशाने घेतले पैसे प्रस्तुत शाळेतील लिपिक मोहम्मद हकीम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शाळेतील पालकाणे  या बाबत जाब विचारला असता त्यांनी आम्ही सदरील रक्कम  मुख्याध्यापिका यांच्या सांगण्यावरूनच विद्यार्थ्यांकडून जमा करून त्यांना देत आहोत तुम्ही काही कारवाई करू नका तुमचे पैसे परत द्यायला लावतो असे सांगितले
 लेखी तक्रार द्या कारवाई करतो :- विठ्ठल भुसारे या सर्व प्रकाराबाबत संबंधित पत्रकाराने, पालकांनी उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की 1 ली ते 8 वि पर्यंत च्या सर्व अनुदानित शाळांना विद्यार्थ्यांकडून फी अकारण्याचा कोणताही अधिकार नसून आर टी ई अंतर्गत पहिली ते आठवी चे शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे यापूर्वीही सदरील शाळेच्या तोंडी तक्रारी आल्या नसून आपण लेखी तक्रार केल्यानंतर कार्यवाही करण्याचे आश्वासन उप शिक्षणाधिकारी विठठल भुसारे यांनी दिले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें