देवगावफाटा येथील अपघातात दोन ठार.दोन जखमी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 19 मई 2019

देवगावफाटा येथील अपघातात दोन ठार.दोन जखमी.



सेलू प्रतिनिधी

                       जालना - जिंतूर महामार्गावर देवगावफाटा पासून जवळच असलेल्या गुरुद्वारा समोर दोन मोटरसायकल ,पिकप व ट्रक या चार वाहनांचा  अपघात झाला असून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला तर  अन्य दोघे जखमी झाले आहेत .
                    ही घटना  १९ मे रोजी दुपारी ४:१५ वा. सुमारास घडली.याबाबतची  माहिती अशी की, मंठा कडून देवगावफाटा कडे  पिकअप क्रमांक एम एच २१ बीएच २०९७ हे येत असताना समोरून मंठा कडे जाणारी दुचाकी क्रं एम एच २२ ए एफ ३६४८ ला पिकअप ने धडक दिली.हि दुचाकी पाठीमागुन येणारी दुचाकी क्रमांक एम एच ३८ ए ६७९३ या दुचाकीवर आदळली या दुचकीसह दुचाकीवरील  बापूराव शेषराव खराबे वय ६५ (रा.हेलस ता.मंठा )पांडुरंग तुळशीराम शिंदे वय २५ (रा.कुंभारी ता.सेलू)  हे पाठीमागुन येणारा जालनाकडे जाणार्या  ट्रक(क्रं ए.पी.१६ टि.सी.१९७८)खाली चिरडले गेले यामध्ये दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
                   तर या समोरील दुचाकीवरील वसंत नामू चव्हाण(रा.कवडा ) अनेक एक जण गंभीर जखमी झाले घटनास्थळी महामार्गाचे पोलीस कर्मचारी नवनाथ लोखंडे शिवाजी गिरी व चारठाणा पोलीस स्टेशनचे स.पो.नी बाळू गिरी हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले त्यांनी जखमींना मंठा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघातामुळे एक तास वाहतुक खोळंबली दोन्ही बाजूकडील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या . एक तासानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.दरम्यान घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा करून बापुराव खराबे व पांडुरंग शिंदे या दोघांचा मृतदेह मंठा येथील शासकीय रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें