घराचे बांधकाम चालू असताना हाडाचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ.सेलूतील पारधी वाडा येथील घटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 24 मई 2019

घराचे बांधकाम चालू असताना हाडाचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ.सेलूतील पारधी वाडा येथील घटना.



सेलू प्रतिनिधी

 सेलू येथील वालूर नाका भागातील पारधी वाडा येथील एका घराचे बांधकाम चालू असताना मानसाचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली असून हा घातपाताचा प्रकार आहे की अन्य काही याबाबतचा तपास करण्याकरता पोलिसांनी सापडलेल्या सदरील सांगाड्याची हाडे तपासण्या करता पाठवली आहेत

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सेलू येथील वालूर नाका भागातील पारधी वाडा येथे शाहू लक्ष्मण पवार यांचे घर असून समोर मोकळी जागा आहे शाहू पवार यांना घरकुल मंजूर झाले असून घरकुल बांधण्याकरिता पाया खोदत असताना अंदाजे चार फुटाचे  खोदकाम केले असता जमिनीत माणसाचा हाडाचा सांगाडा सापडला असून सदरील सांगाड्याला कपडे घातलेले होते कपड्या सहित सांगाडा हा प्लास्टिक मध्ये गुंडाळून ठेवलेला सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे शाहू पवार यांनी याबाबतची कल्पना पोलिसांना दिली मात्र सदरील सांगाडा हा त्यांचे वडील लक्ष्मण पवार यांचा असावा असे शाहू पवार यांनी सांगितले मात्र  लक्ष्मण पवार हे वीस वर्षांपूर्वी हरवले होते तक्रार पोलिसात दाखल केली होती असे शाहू पवार यांचे म्हणणे आहे मात्र जर ते हरवले होते तर त्यांच्या राहत्या घराच्या जमिनीत असलेला सांगाडा त्यांचा कसा असू शकतो अशा एक ना अनेक शंका-कुशंका निर्माण होत असून याबाबत घटनास्थळी पोलिसांनी पाहणी व पंचनामा केला असून सापडलेल्या सांगाड्याची हाडे कुणाची आहेत याबाबतचा तपास सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिपान शेळके हे करत आहेत

पवार यांच्या राहत्या घरी बांधकामाकरिता खोदलेल्या सदरील जागेवर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे तसेच पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी भेट दिली असून सापडलेल्या सांगाड्याची हाडे तपासणी करता उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत सदरील प्रकरणातील सापडलेला हाडाचा सांगाडा त्यांच्या वडिलांचा आहे की अन्य कुणाचा याबाबत तपासाचे पोलिसांसमोर आव्हान आहे

सदरील घटनाही शुक्रवार दिनांक 24 मे 2019 रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली असून या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें