सेलू प्रतिनिधी समशेर खान.
गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे सेलू तालुक्यातील वलवाडी आणि राजा या दोन गावातील नागरिकांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला असून एकाही ग्रामस्थाने मतदान केले नसल्याचे कळते
याबाबतचे वृत्त असे की गेल्या पंधरा दिवसापूर्वी सेलू तालुक्यातील वलंगवाडी आणि राजा या दोन गावातील ग्रामस्थांनी सेलू येथील उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकत असल्याबाबतचे निवेदन दिले होते त्यानुसार दुसर्या टप्प्यात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत निवेदन दिल्यानुसार दोन्ही गावातील नागरिकांनी लोकसभा 2019 च्या होत असलेल्या मतदानावर आज रोजी बहिष्कार टाकून निषेध नोंदवला त्यामुळे सदरील गावातील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मात्र मतदाना करिता एकही मतदार नागरिक मतदान केंद्रावर फिरकला नसल्यामुळे मतदान केंद्रात शुकशुकाट दिसून येत होता शासनाचे प्रतिनिधी म्हणून सेलूचे तहसीलदार बालाजी शेवाळे तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी या दोनही गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना मतदान करण्याविषयी प्रयत्न केले मात्र वलंगवाडी व राजा या दोन्ही गावातील नागरिकांनी जोपर्यंत आमच्या गावाला पक्का रस्ता होत नाही तोपर्यंत मतदानावर आमचा बहिष्कार असल्यामुळे आमच्या गावातील एकही मतदार मतदान करणार नाही या ठाम भूमिकेवर राहून त्यांनी होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे वलंगवाडी येथील मतदार संख्या 276 असून राजा येथे 718 मतदार संख्या आहे त्यामुळे एकूण जवळपास एक हजार नागरिकांनी मतदान केलेले नाही याची जान आतातरी राजकीय नेत्यांनी ठेवावी तसेच या दोन गावांच्या व्यतिरिक्त इतर अनेक गावे अशी आहेत जिथे पाणी रस्ता विद्युत पुरवठा आधी आवश्यक गरजांचा तुटवडा असून अद्याप पर्यंत या सुविधा त्यांना पोहोचलेल्या नाहीत याबाबत तहसीलदार बालाजी शेवाळे यांना विचारले असता त्यांनीही हे मान्य केले की वलवाडी येथे जाण्याकरिता रस्ताच नसून आम्हाला जाण्याकरता अर्धा तास लागला त्यामुळे वलवाडी येथील नागरिकांची मागणी रास्त आहे मात्र लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकू नये याकरिता तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली मात्र ग्रामस्थ मानावयास तयार नसल्यामुळे आमचा नाविलाज झाला.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें