सेलू प्रतिनिधी समशेर खान
सध्या होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकी करीता निवडणूक प्रतिनिधी म्हणून सेलू तालुक्यातील दोन ते अडीच हजार कर्मचारी निवडणूक प्रतिनिधी म्हणून कार्यरत झालेले आहेत मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी अन्य विधानसभा मतदारसंघात पाठवणार असल्यामुळे त्या कर्मचाऱ्याचे मतदान करण्याकरिता त्यास इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट अर्थात निवडणूक सेवा प्रमाणपत्र आवश्यक आहे व हे प्रमाणपत्र घेण्याकरिता सेलू तालुक्यातील कर्मचाऱ्यांना जिंतूर तहसील कार्यालयातून दिले जाणार आहे यामुळे सदरील प्रमाणपत्र घेण्याकरीता महिला व पुरूष कर्मचाऱ्यांना जिंतूर येथे जाऊन ते प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे त्याकरिता सुट्टीच्या दिवशी जिंतूर येथे जाण्याचा व येण्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे त्यापेक्षा मतदान न केलेलेच बरे असे म्हणुन मतदान टाळलेलेच बरे त्यामुळे सेलू तालुक्यातील किमान दोन ते अडीच हजार कर्मचारी मतदान करणार असल्याचे भयावह सत्य समोर येत आहे त्यामुळे एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता शासन प्रयत्न करीत आहे मात्र अशाप्रकारे निवडणूक कर्मचारी जर मतदानापासून वंचित राहणार असेल तर जिल्हाधिकारी यांनी यातून काही पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे
येत्या 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात परभणी जिल्ह्यात लोकसभे करिता मतदान होत आहे या मतदानात करिता निवडणूक कर्मचारी म्हणून सेलू तालुक्यातून दोन ते अडीच हजार कर्मचारी शिक्षक निवडणूक प्रतिनिधी म्हणून कार्यरत केलेले आहेत या कर्मचाऱ्यांच्या आजपर्यंत दोन ट्रेनिंग देखील झालेल्या आहेत या सर्व सेलू तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे मतदान आपापल्या गावात मतदार यादीत असून त्यांना पोस्टल बॅलेट द्वारे देखील मतदान करता येते तसेच इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट घेऊन ज्या ठिकाणी निवडणुकीची ड्युटी आहे त्याठिकाणी देखील सदरचे प्रमाणपत्र देऊन मतदान करता येते मात्र सेलू तालुका हा जिंतूर विधानसभा मतदार संघाशी जोडला आहे व या लोकसभा निवडणुकीची सर्व कामे सध्या जिंतूर तहसील कार्यालयातून होत आहेत उपजिल्हाधिकारी तहसीलदार तसेच इतर सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामाकरिता जिंतूर येथे जात आहेत त्यामुळे निवडणूक कामी असलेले इतर कर्मचारी यांना पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करता आले असते मात्र ही व्यवस्था सेलू तालुक्यात उपलब्ध करून दिली नसल्याचे समजते त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय पर्याय नाही व हे प्रमाणपत्र उपलब्ध करण्याकरिता सदरील सर्व कर्मचाऱ्यांना जिंतूर येथे जाऊन सदरील प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावे लागेल त्याकरिता महिला कर्मचारी असो की पुरुष कर्मचारी यांना जिंतूर येथे जाण्याचा येण्याचा व एवढ्या कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे त्यापेक्षा मतदान न केलेलेच बरे अशी समजूत करून हजारो कर्मचारी मतदानच करणार नसतील तर याला जबाबदार कोण असा प्रश्न पडतो एकीकडे एका मतदाराचे मतदान व्हावे याकरिता शासन प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे हजारो कर्मचारी जर मतदान करणार नसतील तर याबाबत जागृती कोण करणार कारण मतदान करण्याकरिता इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट उपलब्ध करण्याकरिता दोनशे ते तीनशे रुपये खर्च करून कोणत्याही कर्मचार्याला मतदान करावे असे वाटणार नाही त्यामुळे सेलू तालुक्यातील मतदान कमी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट द्वारे मतदान अथवा इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट सेलू येथील तहसील अथवा उपविभागीय कार्यालयातच उपलब्ध करून द्यावे ज्यामुळे सदरच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मतदान होईल व कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही या बाबीकडे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें