शिक्षण, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना समर्पित असलेल्या महाराष्ट्रातील 155 व्हाट्सएप्प ग्रुप असलेल्या अतिशय लोकप्रिय पॅनेल चा महाराष्ट्र शिक्षक पॅनेल नावाचे 155 ग्रुप च्या वतीने राज्यस्तरीय सेवासन्मान सोहळा 31 मे 2019 रोजी औरंगाबाद येतील तापडिया नाट्यमंदिर मधे आयोजित करण्यात आलेले आहे त्याच्या परभणी जिल्ह्याच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
आपल्या शिक्षकांकडे असणाऱ्या महितीची देवाण घेवाण व्हावी या उद्देशाने रोजी काही धेय्यवेड्या शिक्षकांनी एकत्र येऊन या ग्रुप ची स्थापना केली आणि आजच्या घडीला या महाराष्ट्र शिक्षक पॅनेल मधे पूर्ण महाराष्ट्रातील 39000 पेक्षा जास्त शिक्षक सहभागी आहेत. या ग्रुपच्या वतीने दररोज शाळा, शिक्षक आणि शैक्षणिक घडामोडी याबाबत माहिती दिली जाते.
महाराष्ट्र शिक्षक पॅनेल च्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून एक सर्वांगसुंदर शाळा एक आदर्श शिक्षक आणि एक शिक्षिका असे पुरस्कार दिले जाणार आहेत त्यापैकी परभणी जिल्ह्यतुन सर्वांगसुंदर शाळा म्हणुन यासेर उर्दू प्राथमिक शाळा सेलु आणि जि.प.प्राथमिक शाळा इटलापुर ता.परभणी या शाळांची निवड झाली आहे.
या दोन्ही सर्वांगसुंदर शाळांचे वैशिष्ट्ये म्हणजे शाळेत नियमितपणे विविध उपक्रम घेतले जातात तसेच विविध सामाजिक कार्यक्रमात या शाळेचे विद्यार्थी हिरिरिणे भाग घेतात, या शाळेत कित्येक विद्यार्थी हे विविध क्रीड़ा प्रकारांत जिल्हा व राज्यस्तरपर्यंत पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर या शाळांत बालसभा, प्रश्नमंजूषा, बालआनंद मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जातात व त्याशिवाय शाळेत विविध कार्यक्रम घेतले जातात तसेच दर्जेदार शालेय पोषण आहार व त्याबाबत अद्ययावत अभिलेखे ठेवलेली आहेत. या शाळांत संगणक उपलब्ध आहे व त्याचा वापर वर्गात अतिशय योग्य पद्धतीने केला जातो,सर्व वर्गात विद्युतीकरण करण्यात आलेले आहे,शाळासिध्दी स्वंय मुल्यमापनात ह्या शाळा ' अ 'श्रेणी धारण करतात म्हणजेच ह्या शाळा प्रगत शाळा म्हणुन गणल्या जातात.
त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातुन आदर्श शिक्षक म्हणुन जि.प.प्राथमिक शाळा भिलज ता.जिंतुर येथील शिक्षक प्रकाश बाबुराव डुबे यांची तर आदर्श शिक्षिका म्हणुन केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलु येथील शिक्षिका सौ.जयश्री सोन्नेकर यांची निवड झाली आहे.
प्रकाश डुबे हे अतिशय उपक्रमशील शिक्षक म्हणुन सर्वदुर प्रसिद्द आहेत त्यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी खुप वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत त्यात त्यांनी तारेवरचे ग्रंथालय स्थापन केले, आपल्या शाळेला स्वतः रंगरंगोटी करून सजावट केली, शाळेला अनेक ग्रन्थ भेट म्हणुन दिले, अनुपस्थित विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन समुपदेशन केले, विविध क्रीड़ा प्रकारांत विद्यार्थ्यांना विभाग स्तरापर्यंत नेले, वेगवेगळ्या प्रकारांची भित्तिपत्रके स्वतः निर्माण केली, स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थी दत्तक घेऊन त्याला मदत केली म्हणुन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
त्याचबरोबर सौ.जयश्री सोन्नेकर ह्या अष्टपैलू शिक्षिका म्हणुन ओळखल्या जातात त्यांनी आपला वर्ग प्रगत केलेला आहे त्याचबरोबर स्वखर्चातून शाळेतील वर्गाला रंगरंगोटी केली आहे.त्या कथा,कविता,चारोळ्या लेखिका आहेत त्यांनी स्तंभलेखन, दिवाळी अंक, मासिके यातून लेखन पण केलेले आहे त्याशिवाय 1500 पेक्षा अधिक विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचलन केले आहे, त्यांच्या नाटकातील अभिनयाला सतत 5 वर्ष कामगार कल्याण मंडळाचे उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले आहे, त्यांनी विधि प्राधिकरण सेलु येथे महिला सदस्य म्हणुन 3 वर्ष काम पाहिले तसेच लई भन्नाट या चित्रपटात भुमिका देखील केली आहे
या पुरस्कारांची निवड पठाण रहेमान लालखान आणि अशोक हरिभाऊ लाड यांनी केली आहे जे की महाराष्ट्र शिक्षक पॅनेल च्या पोस्ट टिम चे सदस्य आहेत.सर्व पुरस्कार विजेत्यांचे समाजाच्या सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें