योगेश मोरे / प्रतिनिधी
औरंगाबाद
दि.18.04.2019
गंगापुर तालुक्यातील जवळच असलेल्या रांजणगाव पोळ येथील नदीमध्ये सुरु असलेल्या जिल्हा परिषद औरंगाबाद सिंचन विभागाच्या अंतर्गत 14 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात येत असलेल्या सिंमेटी बंधा-यांचे काम ठेकेदेराने मूळ पायापासून निकृष्ट दर्जाचे करत असल्याने राज्य सरकारच्या महत्वकांक्षी असलेल्या पाणी आडवा ,पाणी जिरवा योजनेला मोठी हारताळ बसत असून यामध्ये अधिकारी आणि संबधित ठेकेदारांनी मिलीभगत करुन लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये प्रशासन व्यस्त असल्याने दिवसराञ काम उरकून घेण्याचा सपाटा लावला असून याकडे जिल्हा परिषद सिंचन विभागाने पूर्ण पणे दुर्लक्ष होत असल्याने या बंधा-यांच्या मूळ पायाभरणीसाठी निकृष्ट दर्जा असलेली वाळू,आणि खडी दगडाचा वापर होत आहे.विशेष म्हणजे ज्या नदीमध्ये या सिंमेटी बंधा-याचे काम सुरु आहे. त्याच नदीमधली वाळू या बंधा-यासाठी वापरण्यात येत आहे. लोकसभेची निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने अधिकारी वर्ग या निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने ठेकेदार या वेळेची संधी साधत आहे. या सिंमेटी बंधा-याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची निविदा कामाचे परीपञक लावण्यात आलेले नाहीत. या बंधा-यांच्या झालेल्या बांधकामावर मजबुतीकरणासाठी पाणी मारण्याचा ही अभाव असल्याने आतापासूनच बांधकामातील खडी निखळत आहे. त्यामुळे या सिंमेटी बंधा-याबाबत होणा-या निकृष्ट काम त्वरीत बंद करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया.श्री. कांबळे कनिष्ठ अभियंता सिंचन विभाग जि.प .यांना विचारले असता ते म्हणाले की मी साईटवर जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करतो.आणि जर वाळू निकृष्ट असेल तर ती बदलायला सांगतो.
रांजणगाव पोळ येथे जि.प सिंचन विभागाच्या निधीमधून सुरु असलेल्या सिंमेटी बंधा-यांचे निकृष्ट दर्जाचे काम होत असून मातीमिश्रीत वाळू,निकृष्ट खडी वापरण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें