वाळूच्या ढिगाऱ्याखाली येऊन दोन मुलांचा गुदमरून मृत्यूभोकरदन तालुक्यातील गोकुळ येथिल घटना ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 24 मार्च 2019

वाळूच्या ढिगाऱ्याखाली येऊन दोन मुलांचा गुदमरून मृत्यूभोकरदन तालुक्यातील गोकुळ येथिल घटना !

 
शेख सलिम

   भोकरदन प्रतिनिधी :  भोकरदन तालुक्यात असलेल्या मौजे गोकुळ येथे शनिवारी ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असताना ट्रॅक्टरच्या ढिगाऱ्याखाली येऊन दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. योगेश कोंडीबा तराळ (18) व अनिकेत विक्रम तराळ (17) अशी या दोघांची नावं आहेत.
हे दोघेजण गावाजवळील नदीमध्ये रात्रीच्या वेळी वाळू भरत असताना अचानक वाळूचा ढिगारा खचला आणि या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. गोकुळ येथील शेतकरी कोंडीबा भगवान तराळ यांचा मुलगा योगेश कोंडीबा तराळ आणि गावातीलच विक्रम गणपत तराळ यांचा मुलगा अनिकेत विक्रम तराळ व अन्य दोन जण गावाजवळील केळणा नदीपात्रामध्ये रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्यासाठी गेले असता योगेश आणि अनिकेत हे दोघेजण नदीपात्रात पडलेल्या मोठ्या भगदाडात वाळू भरण्यासाठी उतरले.
अन्य दोघे जण टोपल्या ने वाळूवर घेण्यासाठी वरच्या बाजूने उभे होते. मात्र, वाळू भरत असताना अचानक भला मोठा ढिगारा खचून तो ढिगारा योगेश आणि अनिकेत यांच्या अंगावर कोसळला. ढिगारा अंगावर कोसळताच ते दोघेही त्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे दबले गेले व अन्य दोघांनी ते दबल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गावाकडे धाव घेऊन नागरिकांना बोलावले. सदर बातमी गावात पोहोचताच नागरिकांनी नदी पात्राकडे धाव घेतली व त्यांचा शोध घेणे सुरू केले. मात्र शोध घेण्याआगोदरच काही क्षणामध्येच त्यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. अनिकेत या मुलाने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि योगेश हा अकरावी इयत्तेत शिकत होता. मात्र काळाने त्यांच्यावर अचानक झडप घातल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें