प्रशासनाने मार्च एंडच्या नावाखाली दुष्काळग्रस्त गंगापूर तालुक्यातील वसुली थांबवावी:-मनसे जिल्हा सचिव वाल्मिक शिरसाठ यांची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 मार्च 2019

प्रशासनाने मार्च एंडच्या नावाखाली दुष्काळग्रस्त गंगापूर तालुक्यातील वसुली थांबवावी:-मनसे जिल्हा सचिव वाल्मिक शिरसाठ यांची मागणी.


योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि-12-03-2019

गंगापूर(प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या पिकविम्याची व इतर अनुदानाची खात्यावर आलेली रक्कम बँकेचे अधिकारी परस्पर कर्ज खात्यात वर्ग करून सक्तीची वसुली करीत आहे तर विजवितारण कंपनीचे अधिकारी देखील मार्चएन्ड च्या नावाखाली शेतकऱ्यांना घरघुती बिलासाठी वेठीस धरीत आहे.हा गैरप्रकार तात्काळ थांबवा नसता मनसेच्या वतीने शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना जोडे मारो आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव वाल्मिक शिरसाठ यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉ अरुण जऱ्हाड यांची भेट घेऊन  राष्ट्रीयकृत बँका व वीज वितरण कंपनीच्या सक्तीच्या वसुली बाबत कैफियत मांडली. निवेदनात म्हटले आहे की दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना शेतीचे कोणतेही उत्पन्न नाही सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे तसेच शासनाच्या इतर अनुदानाची रक्कम जमा होत आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य पाहता दुष्काळी भागात कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करू नये असे शासनाचे आदेश आहेत.तरी देखील बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परस्पर कर्ज खात्यात जमा करीत आहे.तसेच विज वितरण कंपनीचे अधिकारी देखील घरघुती वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहे.यामुळे दुष्काळाने त्रस्त झालेला शेतकरी वर्ग मानसिक तणावाखाली जाऊन भविष्यात शेतकरी आत्महत्या वाढल्यास याला बँकेचे अधिकारी,वीज वितरण कंपनीचे अधिकारी व राज्य शासन जवाबदार राहतील म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी हि सक्तीची वसुली तात्काळ थांबवून कपात केलेली सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना जोडे मारो आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे ता अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, मुकुंद पाठे,मनोज पुंडेकर,अशोक कराळे,रामेश्वर गायकवाड आदींसह शेषराव पा साळुंके,बाळासाहेब टेमकर,सोन्याबापू डोळस आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.
*परस्पर वसुली होत असल्यास शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावी*
दुष्काळी परिस्थिती असल्याने कोणतीही सक्तीची वसुली करू नये असे शासनाचे आदेश आहेत तरी देखील बँक अधिकारी अशी वसुली करीत असेल तर शेतकऱ्यांनी पीक विम्याची व  अनुदानाची रक्कम परस्पर कर्ज खात्यात वर्ग करून सक्तीची वसुली करू नये असा अर्ज बँक अधिकाऱ्यांना देऊन त्याची एक प्रत तहसील कार्यालयात द्यावी.मनसेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी याकामी सहकार्य केले जाईल असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें