योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि-12-03-2019
गंगापूर ( प्रतिनिधी ) गंगापूर येथील संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये 10वे वार्षिक स्नेहसंमेलन आज उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उदघाटन जि. प.अध्यक्षा सौ.देवयानीताई डोनगावकर यांनी केले,तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री.उमेश पाटील ,सचिव सौ.सुलभा कुलकर्णी ,श्री.अरविंद नहाटा उपस्थित होते.
कार्यक्रमात सौ. देवयानीताई यांनी शिक्षणाचे महत्त्व उपस्थित पालकवर्गांना सांगितले.
या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कला सादर केल्या. बेटी बचाओ,प्लास्टिक बंदी,कृष्ण सुदामा अश्या विविध विषयांवर नाटिका सादर केल्या व उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 7वी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने केले व त्यांना पूनम पटारे, नेहा सोनवणे , अमृता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व स्टाफने खूप मेहनत घेतली.
खूप मोठ्या संख्येने पालकवर्गाची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली
कार्यक्रमाची सांगता शाळेच्या मुख्याध्यापिका अशियाना बागवान यांनी केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें