परभणी, दि. 10/03/2019:- भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 (अ) अन्वये निवडणूक पत्रकाच्या व भित्तीपत्रकाच्या छपाईबाबत निर्बंध घालण्यात येत असून छपाई कामे करणाऱ्या प्रेस धारकांनी भित्तीपत्रके इत्यादीच्या मुद्रणाचे दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव पत्ता नसेल असे कोणतेही निवडणूक पत्रक अथवा भित्तीपत्रक मुद्रीत वा प्रकाशित करता येणार नाही अथवा मुद्रीत किंवा प्रकाशित करता येणार नाही.
मुद्रकाने पत्रक मुद्रीत केल्यानंतर प्रकाशकाने स्वत:च्या सहीचे अधिकथन मुद्रकाला दोन प्रतीमध्ये देणे आवश्यक आहे. आणि ते मुद्रकाने जिल्हाधिकारी यांना दोन प्रतित देणे बंधनकारक आहे.तसेच जिल्हादंडाधिकारी परभणी यांच्याकडे गृह शाखेत विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्र व मुद्रीत दस्तऐवजाच्या प्रती त्वरीत सादर करण्याबाबत तरतूद आहे.तरी सर्व प्रिटींग प्रेसधारकांनी या बाबतीत अधिक माहितीकरीता आणि प्रतिज्ञा पत्राकरीता जिल्हादंडाधिकारी कार्यालयातील गृह शाखेस संपर्क साधावा.
कोणीही मुद्रक कलम 127 अ चे उल्लंघन करतील लोकसभा निवडणूक संदर्भातील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा राजकीय पक्षाच्याकरीता कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन करुन छपाई करुन देतील त्यांच्याविरुध्द अधिनियमातील तरतूदीनूसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सविस्तर सुचना कार्यालयातील वेळेत जिल्हादंडाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत उपलब्ध आहेत.असे परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें