सोनपेठ शहरातील जील्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत स्नेह संमेलन संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 मार्च 2019

सोनपेठ शहरातील जील्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत स्नेह संमेलन संपन्न.



सोनपेठ (प्रतिनीधी) :-15/03/2019.

सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत स्नेहसंमेलन संपन्न,चिमुकल्या बालकांचा अभिनव उत्सव विविध कलागुणांच्या अविष्कारात धुमधडाक्याने स्नेहसंमेलन साजरे या बालकलागुणांनी पुरेपुर भरलेल्या या कार्यक्रमास उद्घाटक गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण, प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे, केंद्र प्रमुख गणपत कोटलवार, जय भवानी मित्र मंडळ अध्यक्ष बळीराम काटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी, उपाध्यक्षा बिराजदार ताई, सदस्य अचूतराव कदम, आसेफ मुल्लांनी, सदस्या चौथवे ताई, स्वामी ताई, चव्हाण ताई, रो.संजय आढे, बबन कुरे गुरुजी, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, पत्रकार बांधव आदींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व रिबन कापून उद्घाटन करण्यात आले,यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड तर उद्घाटनपर मनोगतात गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण यांनी सर्वाना शुभकामना व्यक्त करून सर्व विध्यार्थी यांना सूचना केल्या,बालनाट्य ,नृत्य,एकांकिका निडर व उत्साहात सादर करणार्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पालकांनी व ग्रामस्थांनी बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यासोबतच स्नेहसंमेलनाचा भरपूर आस्वाद घेतला.विशेष जय भवानी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी स्वरुपात सर्व महिला पालकांना सुरक्षा प्रधान केली, या प्रसंगी सूत्रसंचालन राऊत सर आभार देशमुख सर यांनी तर राठोड सर, पांचाळ सर, लहाने सर, मुंडे सर, गायकवाड मँडम, भराडे मँडम, जोशी मँडम, बारगजे मँडम, राठोड मँडम,प्रकाश तिरमले आदींनी परिश्रम  घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें