पत्रकार योगेश तू.मोरे यांनी घेतली लेखक बाळासाहेब पवार यांची भेट . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 मार्च 2019

पत्रकार योगेश तू.मोरे यांनी घेतली लेखक बाळासाहेब पवार यांची भेट .

गंगापूर प्रतिनिधी:
गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब भानुदास पवार यांची गंगापूर तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार योगेश मोरे यांनी प्रत्यक्ष मुलाखत घेतली.यावेळी ले.बाळासाहेब पवार यांनी श्रीक्षेत्र नेवरगाव येथील ग्रामदैवत "श्री संकटेश्वर दर्शन "या नावाने पुस्तिका लिहिलेली असून या पुस्तकात श्री संकटेश्वर महादेवाचे सविस्तर पणे पौराणिक, सांस्कृतिक, धार्मिक माहात्म्य या विषयी माहिती आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या या पुस्तकाच्या दहा हजारपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री सम्पूर्ण गंगापूर, औरंगाबाद,पैठण भागात झालेली असून,हे साहित्य त्यांनी त्यांचे गुरुवर्य ह.भ.प रामभाऊ महाराज राऊत यांना अर्पण केलेले असून या पुस्तकाला प्रस्तावना कविवर्य ज्ञानेश्वर भागवत यांनी दिलेली असून,तसेच अभिप्राय ह.भ.प.दत्तात्रय बहिरट महाराज यांनी दिलेला आहे.अशी माहिती त्यांनी गंगापूर येथील मराठी साहित्यिक,प्रसिद्ध व्याख्याते,गीतकार, संगीतकार तथा पत्रकार योगेश तू.मोरे यांना दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें