लोकसभेत राजेश विटेकर यांचा विजय निश्चितच --माजी मंत्री सुरेश वरपुडकर.
सोनपेठ(मंजूर मूल्ला )
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सास्कृतीक सभागृहात दि.7 मार्च गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मनो- मिलन मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. . . या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.बाबाजानी दुर्रानी, प्रमुख उपस्थित माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, मा.आ.व्यकटराव कदम, मा.जि.प.अध्यक्ष तथा भावि उमेदवार राजेश विटेकर,न.प.गटनेते चद्रकांत राठोड,जि.प.सभापती विठ्ठलराव सुर्यवंशी पाटील,मा.जि.प.सदस्य लक्ष्मीकांत देशमुख, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दशरथ सुर्यवंशी पाटील, काँग्रेस न.प. उपनगराध्यक्ष दत्तराव कदम,डिंगाबर पाटील, उत्तमराव शिंदे, बाबुराव जाधव, अँड.अशोक यादव,सरपंच मदनराव भोसले, गोपाळ भोसले आदिंची उपस्थिती होती, मान्यवंरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांचे स्वागत अँड.श्रीकांत विटेकर, डाँ.श्रीनिवास गुळभीले, सुनिल बर्वे, अमृत स्वामी, लहुकुमार वाकनकर,निलेश राठोड,मलीक बागवान,आदिंनी केले, या प्रसंगी व्यापारी महासंघ प्रतिनीधी यांच्या वतीने सुरेश वरपुडकर व बाबाजानी दुर्राणी यांचा विशेष सत्कार केला. प्रास्तविक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रा.डाँ.धोंडगे यांनी तर मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दशरथ सुर्यवंशी पाटील,न.प.गटनेते चंद्रकांत राठोड,लक्ष्मीकांत देशमुख, यावेळी मा.जि प.अध्यक्ष राजेश विटेकर बोलताना सोनपेठ तालुका हा जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका आहे या तालुक्यातुन प्रथमच परभणी लोकसभा लढवण्यासाठी सर्व जेष्ठ नेत्यांनी एकमताने माझ्या उमेदवारीची शिफारस केली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचा उमेदवार म्हणून मला संधी मिळत आहे.यामुळे उपस्थित असलेल्या तालुक्यातील सर्व जनतेला मि विनंती करतो कि सर्वांनी मिळुन परभणी लोकसभेतील प्रत्येक गावा-गावात, वाडी-तांडा एकत्र करुन देशात व जिल्ह्यात परीवर्तन घडवण्यासाठी आज पासुन माझ्या सोबत कामाला लागावे माझ्यावर प्रेम करणारी तालुक्यातील सर्व जनतेने व दोन्ही पक्षातील नेते व कार्यक्रत्यांने मणभेद व मतभेद विसरुन मला आशिर्वाद द्यावे असे अवाहन हि यावेळी त्यांनी केले.तसेच मा.आ.व्यकटराव कदम यांनी हि मनोगतात स्व.उत्तमराव विटेकर यांना आमदार केले त्याच पध्दतीने राजेश विटेकर यांना पण एकजुटिने दिल्लीला खासदार म्हणुन पाठवनारच असा विश्वास व्यक्त केला,अध्यक्षीय समारोप आ.बाबाजानी दुर्राणी यांनी बोलताना राजेश विटेकर हा सोनपेठ तालुक्याचा उमेदवार म्हणुन तमाम जनतेने आपली ताकद त्याच्या पाठिशी लावावी. राजेश विटेकर भावी खासदार म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला या प्रसंगी मोदी शासनाच्या विरोधात अनेक फसव्या घोषनांनचा तर शिवसेनेच्या राजीनामा खिशातच या प्रकाराचा रोष अनेक उदाहरण देऊन मार्गदर्शनात व्यक्त केला. सुरेश वरपुडकर यांनी समारोपात काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोमिलन करण्यासाठी हा मेळावा आजच्या उपस्थित जनसागर पाहुण राजेश विटेकर यांचा विजय निश्चितच आहे व काँग्रेस कार्यकर्त्यांना खद्यालाखंदा लाऊन कामाला लागा अशी सुचना केली तसेच युती शासन जुमले बाज, घोषनांनचे व फसवे सरकार असा आरोप करुन अनेक उदाहरण देत सरकारचा फसव्या घोषणाचा पाढा वाचला.सुत्रसंचालन शिवमल्हार वाघे यांनी तर आभार अँड.श्रीकांत विटेकर यांनी व्यक्त केले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे प.स.सदस्य, नगरसेवक, सरपंच, चेअरमन तालुका व शहर पदाधिकारी कार्यकर्ते, प्राध्यापक, वकिल, पत्रकार, लहान मोठे व्यापारी बांधव, सर्व धर्मीय नागरीक हजारोंच्या संखेने उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद दिसुन आला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें