सेलूत शीघ्र कृती दलाचे पथसंचलन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 1 मार्च 2019

सेलूत शीघ्र कृती दलाचे पथसंचलन

सेलू प्रतिनिधी


लोकसभा 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेलु शहरात शीघ्र कृती दलाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले या पथसंचलनात शीघ्र कृती दलासह  आरसीपी. क्यू आरसी तसेच सेलू येथील पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान असे एकूण दोनशे जणांच्या कर्मचाऱ्यांनी पथसंचलनात सहभाग होता

येत्या काही दिवसातच लोकसभा 2019 च्या निवडणुकीची आचार संहिता लागण्याची शक्यता असून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच गुंड व दंगेखोर प्रवृत्तीच्या लोकांवर दहशत बसावी त्यांनी आपले डोके वर काढू नये याकरिता पोलीस दलाच्यावतीने सेलु शहरात पथसंचलन करण्यात आले सेलू येथील पोलीस ठाण्यापासून शहराच्या मुख्य रस्त्यावर करण्यात आलेल्या या पथसंचलन सायंकाळी 6 30 च्या दरम्यान करण्यात आले शहरातील पोलीस स्टेशन पासून रेल्वे स्टेशन शिवाजी पुतळा बस स्थानक जिंतूर कॉलनी तसेच क्रांती चौक या मुख्य रस्त्यावरून पोलीस स्टेशन पर्यंत पथसंचलन करण्यात आले या पथसंचलनात शीघ्र कृती दलासह आर   सी पी क्यू आर सी  तसेच सेलू पोलिस व गृहरक्षक दलाचे जवान असे एकूण जवळपास 200 जवानांच्या ताफ्याने पथसंचलन करत सेलू शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले यात हैदराबाद येथील शीघ्र कृती दलाची 99 ही कंपनी सहभागी झाली होती या कंपनीचे निरीक्षक संतोष कुमार . परभणी येथील शिकवू पोलीस उपअधीक्षक तृप्ती जाधव तसेच सेलू येथील पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांचाही सहभाग होता यावेळी बोलताना संतोष कुमार जी म्हणाले की या पथसंचलना मुळे शहरातील भाग आमच्या नजरेखालून घातल्यामुळे जेव्हा गरज पडेल तेव्हा आमचे जवान तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात  आणण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे समाजातील दंगेखोर आणि गुंडप्रवृत्तीचे नागरिक यांच्यावर दहशत बसावी याकरिताच हे पथसंचलन असते तसेच पोलीस निरीक्षक संदीप शेळके हे म्हणाले की या शीघ्र कृती दलाच्या व पोलिसांच्या संयुक्त पथसंचलन मुळे निवडणूक असो अथवा  इतर कुठलीही तणावाची परिस्थिती अशावेळी या पथसंचलन याचा निश्चितच लाभ होतो त्यामुळे या प्रकारचे पथसंचलन करण्यात येते यावेळी सेलू पोलीसातील माधव लोकुलवार  प्रदीप हीरक यांच्यासह पोलिस कर्मचारीही उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें