नॅशनल शाळेच्या प्रांगणात शाहीदांना श्रद्धांजली देश शहिदांच्या पाठीशी - आ. अब्दुल सत्तार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 फ़रवरी 2019

नॅशनल शाळेच्या प्रांगणात शाहीदांना श्रद्धांजली देश शहिदांच्या पाठीशी - आ. अब्दुल सत्तार.


सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.18, जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ  नॅशनल एज्युकेशन संस्थेच्या वतीने निषेध व शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते
   
      सोमवार ( दि.18 ) रोजी शहरातील जमालशाह कॉलोनी भागातील नॅशनल शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम सम्पन्न झाला.यावेळी आमदार अब्दुल सत्तार , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, जि. प.चे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन , नगराध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर , उपसभापती नंदकिशोर सहारे ,जामा मशिद कमिटीचे अध्यक्ष , शेख अब्दुल पाशु, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष धैर्यशील तायडे ,संचालक नरसिंग चव्हाण , सतिष ताठे , खरेदी - विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे, शांतीलाल, नॅशनल संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रईस खान , यांच्यासह भिकचंद कर्णावत, राजुसेट कटारिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.

         पुलवामा येथील हल्ला हा देशावरील हल्ला आहे. या हल्ल्याचा आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. पुलवामा घटनेचा निषेध करून देशातील सर्वच राजकीय पक्षाने यात राजकारण न करता आम्ही सरकार सोबत असल्याचे ठाम पणे सांगितले. यातून आमच्या देशातील एकतेचे दर्शन होते असे स्पष्ठ करीत संपूर्ण देश हा शहिदांच्या पाठीशी असून पुलवामा हल्ल्याचा भारतीय जवान करारा जवाब देतील असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
  कार्यक्रमास रउफ बागवान , सुधाकर पाटील, नंदकिशोर संचेती , मुश्ताक देशमुख रईस मुजावर ,सुनील दुधे , राजश्री निकम , दशरथ सुरडकर , दादाराव पंडित , आत्माराम अग्रवाल ,प्राचार्य अब्दुल इरफान, निजाम पठाण , वकील वसईकर , राजरत्न निकम, शिवाजी दाभाडे ,राजेश्वर आरके , ए. एम. पठाण , मोहम्मद ईल्यास , अमित आरके ,मतीन देशमुख , आसिफ बागवान , डॉ. फेरोज , अब्दुल इरफान , रंगराव जरारे , मुक्तार देशमुख , आदींसह विध्यार्थी , शिक्षक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें