सेलू प्रतिनिधी शमशेर खान
सेलू येथून जवळच असलेल्या डिग्रस(जहांगीर) या गावाला जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झालेली असताना जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष तर होतच आहे. त्यातअधिकारीदेखील दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी व नागरिकांनी दाद
कुणाकडे मागावी, हा प्रश्न जनतेला पडला आहे.सेलू पासून जवळच असलेल्या
डिग्रस (जहांगीर) या गावाला जाणारा रस्ता उपजिल्हा रुग्णालयापासून ते पुढे जवळपास २ ते ३ कि.मी. पूर्णपणे चाळणी झाला आहे. या रस्त्यावर
एवढ्या मोठ्या प्रमाणावर खड़े पडलेले आहेत की, वाहने चालवणे मुश्कील झाले आहे. या रस्त्यावर
शेती असणान्यांसाठी तर या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे मरणयातना
सोसण्यासारखे झाल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. डिग्रस या गावाला मोठे नागदेवतेचे मंदिर देखील आहे. नागपंचमीला दरवर्षी हजारो भाविक पंचक्रोशीतून या गावाला
दर्शनासाठी येतात.त्यांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो.
डिग्रस येथील नागरिकांना देखील दिवसातून अनेकवेळा सेलू येथे
कामानिमित्त यावे लागते. यावेळी त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत
आहे. याच रस्त्यावर मलेमोठेभगदाडदेखील पडले आहे. एखादे वाहन रात्रीच्या अंधारात या खड्यात पडून अपघात देखील होण्याची शक्यता आहे परंतु या सगळ्या
त्रासातून मुक्त होण्यासाठी आणि रस्त्याच्या दुरुस्ती साठीदाद मागायची
तरी कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या रस्त्याकडे लोक प्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. ज्यांना मोठ्या अपेक्षेने जनतेने निवडून
दिले, तेच आता या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच
संबंधित विभागाचे अधिकारी देखील दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न विचारला जात आहे. जर शेतकऱ्यांनाच मागण्या करायच्या तर लोकप्रतिनिधी काय फक्त
मिरवायलाच निवडून द्यायचे का? अशा
संतप्त प्रतिक्रिया जनतेकडून ऐकायला
मिळत आहेत. यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून जनतेचे व शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबवावेत व तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें