सेलू प्रतिनिधी
सेलू संपूर्ण राज्यातील बाजार समितीचे सचिव ते शिपाई पदावरील कायम रोजंदारी व हंगामी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करावे या मागणीसाठी लढा सुरू आहे त्या अनुषंगाने राज्यभरातील बाजार समितीचे कर्मचारी २८ फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार आहेत प्रलंबित मागण्यासाठी सहकार मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे समितीचे गठन करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे कर्मचाऱ्यांना कायम करावे या संदर्भात २७ फेब्रुवारी पर्यंत शासनाला कारवाईसाठी वेळ देण्यात आला आहे कारवाई न झाल्यास २८ फेब्रुवारी पासून सर्व कर्मचारी सहकुटुंब मुंबई येथे धरणे आंदोलन करणार आहेत आंदोलना दरम्यान राज्यभरातील बाजार समित्या बंद राहणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें