तालुका कृषिअधिकारी डी बी व्यवहारे यांना निलंबित करण्याची मागणी,तहसील कार्यालयात धरणे आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 फ़रवरी 2019

तालुका कृषिअधिकारी डी बी व्यवहारे यांना निलंबित करण्याची मागणी,तहसील कार्यालयात धरणे आंदोलन.



शेख सलिम

भोकरदन प्रतिनिधी-

भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे शेतकरी मेळावा व गट क्षमता बांधणी कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी तालुका कृषी अधिकारी डी बी व्यवहारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन पायात चप्पल घालून केले.हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने नंतर याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.दरम्यान या घटनेमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याने भोकरदन येथे तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करून कृषिअधिकारी डी बी व्यवहारे यांचा निषेध केला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो,डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,कृषिअधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर तहसीलदार संतोष गोरड यांना निवेदन देऊन तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबनाची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. निवेदनात दिले की कृषी अधिकारी व्यवहारे यांनी बेजबाबदारपणे पायात चप्पल घालून प्रतिमेचे पूजन केले. या घटनेमुळे सकल शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.एकप्रकारे कृषिआधीकरी यांनी जाणून बुजून महापुरुषांचा अवमान केलेला आहे.त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन कृषी अधिकारी डी बी व्यवहारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. नसता 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व काही अनुचित प्रकार घडल्यास याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेता तहसील कार्यालयात धरणे आंदोलन चालू असताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवेदनावर शिवाजी इंगळे,विकास जाधव, नारायण लोखंडे,दिपक आगलावे,प्रकाश सुरकडर,गौतम साळवे,विष्णू कोलते,रणजित जाधव,मंगल गिराम,नारायण सहाणे,अरुण तळेकर,अनिल भुतेकर आदींच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें