सिल्लोड नगरपालिका वर काँग्रेसच्या झेंडा काँग्रेस २४ तर भाजपा २जागा.नगराध्यक्ष काँग्रेसच्या राजश्री निकम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 28 फ़रवरी 2019

सिल्लोड नगरपालिका वर काँग्रेसच्या झेंडा काँग्रेस २४ तर भाजपा २जागा.नगराध्यक्ष काँग्रेसच्या राजश्री निकम.


सिल्लोड प्रतिनिधी दि.28/02/2019.
सिल्लोड नगरपालिका  निवडणुकीत
 भाजपचा दारूण पराभव झाला असून या पक्षाला गेल्यावेळच्या जागा देखील राखता आलेल्या नाहीत. भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. अब्दुल सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. यात सत्तार यांनी पुन्हा एकदा दानवेंवर मात केली आहे. सिल्लोड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह २६ नगरसेवकांसाठी ७१.९३ टक्के एवढे मतदान झाले होते. नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकपदासाठी १०४ उमेदवार रिंगणात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नगरपालिकेत सत्ता परिवर्तनासाठी जोर लावला होता. मात्र सिल्लोडच्या मतदारांनी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वालाच पसंती देत मतांचे भरभरून दान कॉंग्रेसच्या पारड्यात टाकले आहे. भाजपला फक्त एका प्रभागात विजय मिळवता आला आहे.
सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा कॉंग्रेसने दोन जागा जिंकत आपल्या विजयी घोडदौडीला सुरूवात केली. दुपारी साडेबारा वाजता सर्व १३ प्रभागांचे निकाल हाती आले तेव्हा कॉंग्रेसने तब्बल १२ प्रभागात विजय मिळवला. २६ पैकी २४ नगरसेवकांसह नगराध्यक्षपद देखील कॉंग्रेसनेच पटाकावले. त्यामुळे सिल्लोडमध्ये गिरीश महाजन यांची सभा घेऊनही त्याचा भाजपला काहीच फायदा झाला नाही. उलट भाजपचे नगरपालिकेतील संख्याबळ पाचवरून दोनवर आले आहे.
औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, त्यांचे पुत्र समीर सत्तार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. समीर सत्तार हे मावळते नगराध्यक्ष होते. आगामी विधानसभा निवडणुका पाहता सत्तार यांच्यासाठी नगरपालिकेत पुन्हा सत्ता मिळवणे महत्वाचे होते. निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्तार यांनी सिल्लोडमध्ये तळ ठोकला होता. प्रभावी प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे त्याचे भरघोस यश कॉंग्रेसला मिळाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें