जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथे शिवजन्म महोत्सव उत्साहात साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 फ़रवरी 2019

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथे शिवजन्म महोत्सव उत्साहात साजरा.

“गोंधळी” या लोककलावंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे गायन करून विद्यार्थ्यांची मनं जिंकली”


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथे आज 'छत्रपती शिवाजी महाराज'यांची जयंती थाटामाटात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राम मैफळ तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल आडे, गावचे पोलीस पाटील साहेबराव राठोड, शाळा स्थापन समितीचे सदस्य शिवाजीराव लंघे,गावातील प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब लंघे, शाळेतील शिक्षक श्याम रुपनर, विठ्ठल शेळके, सुभाष लंगे,आदी मान्यवर उपस्थित होते.
   कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर युवराज माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर शाळेतील चिमुकल्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राची लोक कला जिवंत ठेवणारे लोककलावंत गोंधळी यांना खास कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या प्रकारची पोवाडे गायन करून त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून दिला. मुलांनी अतिशय उत्साहात या लोककलावंतांची पोवाडा ऐकून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. लोककलावंतांनी पोवाडा गायन सुरू केल्यानंतर गावातील अनेक माता भगिनी कार्यक्रमास उपस्थित झाल्या. या कलेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूसोबत झुंज देताना कशा पद्धतीची उपयोगिता झाली हे सुद्धा विद्यार्थ्यांना सहजपणे लक्षात आलं. या लोककलावंतांनी विद्यार्थी व गावकऱ्यांना भरभरून अशी वेगवेगळे गीत सादर करून मनोरंजन नाही केलं.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणांमधून शाळेचे मुख्याध्यापक मैफळ सरांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनोगता बद्दल खूप  सार्‍या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले लोक कलावंत यांना सुद्धा खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या .सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी काजल राठोड व अनुराधा शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन नर्सिंगकर सरांनी केले.

                                    युवराज माने
आनंदाचे झाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी तालुका सेलू जिल्हा परभणी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें