शिर्डी प्रतिनिधी
लोणी
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील जि.प. प्राथमिक शाळेत संगणक कक्षाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला . लोणी खुर्द ग्रामपंचायती मार्फत १४व्या वित्त आयोगातून शाळेसाठी संगणक कक्ष व स्मार्ट टीव्ही तसेच ३० खूर्च्या १ डेस्क असे साहित्य प्राप्त झाले.
सोमवार दि. १८ फेब्रुवारी रोजी लोणी मुले शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी लोणी खुर्द गावच्या सरपंच सौ . मनिषाताई हरिभाऊ आहेर या अध्यक्षस्थानी होत्या तसेच उपसरपंच सौ. सुवर्णाताई घोगरे , सर्व ग्रामपंचायत सदस्य व सचिव श्री थिगळे एस् . टी. ( ग्रा. वि.अ. ) तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. भालेराव, उपाध्यक्ष श्री. दातीर व सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच शिक्षण विभागाचे वि. अ. श्री.डी. डी. वाकचौरे व के.प्र. श्री.एस.आर. पवार हेही उपस्थित होते.
प्रथमत संगणक कक्षाचे उद्घाटन सरपंच मनिषाताई आहेर यांनी केले. लोणी खुर्द गावास मिळालेला स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व सचिव यांचे अभिनंदन केले. उद्घाटनप्रसंगी बोलताना सरपंच आहेर ताई यांनी यापुढेही शाळेला सहकार्य करण्याचे सांगितले व शाळेच्या कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले. ग्रा. प. सदस्य श्री आहेर सर, शा. व्य. अ. सौ. भालेराव , वि. अ. श्री.वाकचौरे साहेब , श्री. पवार साहेब यांनी मनोगत व व्यक्त केले.
ग्रामपंचायतीकडून प्राप्त साहित्याचा पुरेपुर व योग्य वापर विद्यार्थ्यांसाठी केला जाईल असे आश्वासन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. डोखे मॅडम यांनी दिले.
सदर कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा मा.ना. सौ. शालिनीताई विखे पा. व तालुक्याच्या ग. शि. अ . श्रीम. मीनाताई शिवगुंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. मेंगाळ सर यांनी केले. प्रास्ताविक श्रीम.बोर्डे यांनी केले. शाळेच्या मुख्या. सौ. डोखे मॅडम यांनी आभिनंदन केले. शाळेतील शिक्षक श्रीम. बनकर, श्रीम. देवकर, श्रीम. दुर्गुडे, श्रीम.वाजे, श्री. मुठे यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला व शेवटी श्री. भागवत सर यांनी आभार मानले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें