सिल्लोड येथील व्यापारी महासंघाच्या वतीने नागरी सत्कार सोहळा संपन्न; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 2 जनवरी 2019

सिल्लोड येथील व्यापारी महासंघाच्या वतीने नागरी सत्कार सोहळा संपन्न;

सामान्यांच्या बळावर राजकारणाची धूरा -- आ.अब्दुल सत्तार;


सिल्लोड : प्रतिनिधी (दि.०२ ) - सिल्लोड शहरातील व्यापारी महासंघाच्या वतीने आ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जिप माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्यासह व्यापाऱ्यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.

शहरातील व्यापारी महासंघासह विविध संस्था संघटनांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित सत्काराला उत्तर देतांना माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार म्हणाले
 शहरासह ग्रामीण भागातील वाडी - वस्ती - तांड्यावरील सामान्य जनतेच्या बळावर राजकारणाची धुरा अवलंबून असुन वाढदिवसानिमित्त माझ्या स्तकाराच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाचे प्रेम स्नेहणे मी भारावून गेलो असुन जनतेने यापुढेही असेच पाठबळ आशिर्वाद कायम राहू द्यावा असे भावनिक उदगार आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. या वेळी पालोदकरांनी कौटुंबिक सत्कार केला.
सिल्लोड शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रम शहरात सर्वत्र फटाक्यांच्या अतिषबाजीने शहरात दिवाळीचे स्वरूप आले होते. आ.अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्यासह व्यापारी रमेश साळवे, नंदकिशोर सहारे, दीपक घरमोडे, विशाल जाधव, सचिन सोळंके, दत्तात्रय बावस्कर, प्रवीण कटारिया, सुदाम सुडके, शीतल गोसावी, संतोष गाडेकर, सिताराम वाघ आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें