सेलू प्रतिनिधी. शमशेर खान.
सेलू आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून लहान मुले महिला व नागरिकांना चावा घेत धुडगूस घालणारे माकडांना अखेर पकडण्यात वन विभागाला यश आले असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सापळा रचून दोन माकडांना पकडण्यात आले आहे
याबाबतचे वृत्त असे की सेलू परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिला व मुलांना नागरिकांना चावा घेत धुडगूस घालणारे माकडांची संख्या वाढली होती त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने शनिवार दिनांक 26 जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान सेलू येथील सहकार वाडी तील गोदामात जवळ पिंजरा लावून एका मोठ्या वानराला पकडण्यात आले तसेच सेलूत पारिजात कॉलनी येथे एका लाल तोंडाच्या माकडाला पकडण्या करता सापळा लावून पिंजरा ठेवला होता त्या पिंजर्यात एक माकड पकडण्यात आले अशाप्रकारे धूळगूउस घालणाऱ्या दोन माकडांना पकडण्यात रेंजर रेखा नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश घुगे राजू कुलकर्णी यांनी माकडाला पकडण्यासाठी सहकार्य केले त्यानंतर सदरील माकडांना अभयारण्यात सोडून देण्यात आले त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली असून मुले व महिला यांच्या मनातील भीतीचे वातावरण समले आहेत त्यामुळे वनविभागाचे व सदरील माकड पकडण्याकरिता सहकार्य करणार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें