सेलू, प्रतिनिधी
दि.१३ : १ : २०१९
सेलू येथील नूतन विद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी झाली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी होते. यावेळी उपमुख्याध्यापक अशोक गाजरे पर्यवेक्षक मा.मा.सुर्वे , वक्ते रामकिशन मखमले, संभाजी रोडगे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी श्री.मखमले यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. स्वामीजींचे विचार जीवनाला दिशा देणारे आहेत. त्यातून प्रेरणा घ्यावी. स्वामीजी हे विश्व शांतीचे प्रचार करणारे अग्रदूत होते, असेही त्यांनी नमूद केले. श्री रोडगे म्हणाले, की राजमाता जिजाऊ ह्या संपूर्ण समाज जीवनाच्या प्रेरणास्रोत, आदर्श माता,आदर्श पालक होत्या. श्री. कुलकर्णी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार चिरंतन आहेत. त्यांचा आदर्श अंगी बाणवावा, असे सांगितले. प्रास्ताविक काशिनाथ पल्लेवाड यांनी केले, तर आभार बाबासाहेब हेलसकर यांनी मानले.
दरम्यान, शाळेत विद्यार्थी, शिक्षकांचे वाढदिवस साजरे केले जातात. विज्ञान शिक्षक नारायण सोळंके यांच्यासह चार विद्यार्थ्यांचे यावेळी मान्यवरांनी त्यांचें अभिनंदन केले. त्यापैकी कृतज्ञता म्हणून सिध्देश सुहास पंडित या आठवी 'ड' तील विद्यार्थ्यांने शाळेला "उपनिषद " हा ग्रंथ भेट दिला. मुख्याध्यापकांनी त्याचे विशेष कौतुक केले.
सेलू : येथील नूतन विद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त. अभिवादन करतांना मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी , अशोक गाजरे मा.मा.सुर्वे ,रामकिशन मखमले, संभाजी रोडगे, काशिनाथ पल्लेवाड आदी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें