सटाणा (प्रतिनिधी) : सचिन उपाध्ये.
मृत्यूनंतर पार्थिवाला मुलाने खांदा द्यावा, अशी प्रथा आहे. मात्र, या सर्व रीतीरिवाजांना फाटा देत बागलाण तालुक्यातील सटाणा येथे मुलींनी आपली आई स्व.रेणुबाई कारभारी राखपसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला.
स्व.रेणुबाई कारभारी राखपसरे यांच्या पार्थिवाला कोणी खांदा द्यावा, असा प्रश्न निर्माण झाला.
आईच्या मृत्यूच्या दु:खात असलेल्या मुलींपर्यंत ही चर्चा गेली आणि त्या मुलींनी आपले दुःख आवरत आम्हीच आमच्या आईच्या पार्थिवाला खांदा देवू असा निर्णय घेतला. त्यानंतर काहींनी या निर्णयाला विरोधही केला. मात्र, आमच्या आईच्या पार्थिवाला आंम्हीच खांदा देवू . आम्हीच आईची मुलं आहोत, असे ठामपणे स्व.रेणुबाई कारभारी राखपसरे यांच्या मुलींनी उपस्थित सर्वांना सांगितले. त्यानंतर मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला.
आई , वडीलांनी मुलगी म्हणून आम्हाला कधीही कमी लेखले नाही. त्याचबरोबर आयुष्यात कधीही स्वतःला मुलगा नसल्याची खंत व्यक्त केली नाही. याचा मुलींचा अभिमान होता. त्यांनी आम्हाला मुलाप्रमाणेच वाढवले. यामूळे आईच्या पार्थिवाला खांदा देवू असा निर्णय घेतला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें