या सरकारकडून अपेक्षा ठेवु नका—विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशानाच्या उद्घाटनप्रसंगी अामदार दूर्राणी यांचे प्रतिपादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 2 दिसंबर 2018

या सरकारकडून अपेक्षा ठेवु नका—विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशानाच्या उद्घाटनप्रसंगी अामदार दूर्राणी यांचे प्रतिपादन.

सेलू प्रतिनिधी शमशेर खान
लोक शिकली की शहाणी होतात. यामुळे या सरकारला लोकांना वाचनापासुन दुर ठेवायचे अाहे. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न हे सरकार जाणिवपुर्वक मार्गी लावत नसुन ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांनी या सरकारकडुन कुठल्याही अपेक्षा ठेवु नयेत असे प्रतिपादन आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी अाहेर बोरगाव येथे आयोजीत मराठवाडा विभाग ग्रंथालयल संघाचे ४३ वे व परभणी जिल्हा ग्रंथालय संघाच्या ३६ व्या संयुक्त अधिवेशनात रविवार २ रोजी  उद्घाटनपर भाषणाप्रसंगी केले.


अाहेर बोरगाव ( ता.सेलू ) येथे स्वामी विवेकानंद ग्रंथालयात संपन्न झालेल्या

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय भांबळे हे होते.तर व्यासपीठावर  स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य राजेंद्र लहाने, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ. रामेश्वर पवार, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाब मगर,पाथरी येथिल बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, जिल्हा परिषदेचे सभापती अशोक काकडे,जिल्हा परिषद सदस्या  इंद्रायणी रोडगे, व. ग. सुर्यवंशी नरहरी मंठेकर, प्राचार्य डाॅ. शरद कुलकर्णी, दादासाहेब टेंगसे, डाॅ. अर्चना बारब्दे, छगन शेरे, भास्करराव पिंपळकर, पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम पावडे, माऊली ताठे, सुधाकर रोकडे, खंडेराव सरनाईक, अनंतराव चाटे, विलास वैद्य, गजानन शिंदे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना आमदार बाबाजाणी दूर्राणी म्हणाले की, या सरकारकडुन पक्षपाती धोरण करण्यात येत असल्याने विकास होत नाही.ग्रंथालये  जिंवत राहिली पाहिजेत असे या सरकार वाटत नाही.यामुळे हे सरकार ग्रंथालयाचे नाव कुठेच काढु देत नाही. येणा-या अर्थसंकल्पिय अघिवेशनात लक्ष्यवेधीद्वारे ग्रंथालयाचा प्रश्न उपस्थित करणार अाहे. जावु द्या आत्ता केवळ एक वर्ष वाट पाहा आमचे सरकार आल्यावर ग्रंथालयाचा प्रश्न निश्चीत निकाली काढु व सध्या ज्या ग्रंथालयांना निधीची आवश्यकता आहे. अशा ग्रंथालयांना माझ्या आमदार फंडातुन निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन यावेळी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी दिले. तर आमदार विजय भांबळे आपल्या अध्यक्षिय भाषणात म्हणाले की, हे सरकार ग्रंथालयाचे प्रस्तावच घेवुन जावु देत नाही. विरोधी पक्षात असतांना मात्र वेगवेगळी आश्वासने या सरकारने दिली होती. या सरकारला कळत नाही वाचक हा कोणत्याही पक्षाचा नसतो केवळ पक्षपातीपणामुळे हे सरकार ग्रंथालय चळवळ खंडित करत आहे. येणा-या काळात या ग्रंथालयाचे प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचेही यावेळी आमदार विजय भांबळे म्हणाले. तसेच एक वर्षानंतर सत्ता आल्यास संबधित खात्याच्या मंत्र्याचा शपथविधीच्या अगोदर ग्रंथालयाचा प्रश्न निकाली काढावयाला लावुन नंतर शपथविधी असा पवित्रा घेणार असल्याचेही आमदार भांबळे म्हणाले. यावेळी स्वागताध्यक्ष राजेंद्र लहाने, डाँ. रामेश्वर पवार, व. ग. सुर्यवंशी, सुनिल हुसे, छगन शेरे, भास्कर पिंपळकर,प्रा.विलास वैद्य,डाॅ.अर्चना बारब्दे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गुलाब मगर, सुत्रसंचलन ज्ञानेश्वर सोळंके तर आभार परमेश्वर लहाने यांनी मानले.अधिवेशन यशस्वितेसाठी संयोजक सर्जेराव लहाने, विलास शिंदे,महादेव अागजाळ यांनी परिश्रम घेतले.यावेळी मराठवाड्यातील ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो ओळी=अाहेर बोरगाव ( ता.सेलू ) —येथिल मराठवाडा विभागीय संयुक्त अधिवेशनाचे उदघाटन करतांना अामदार बाबाजाणी दूर्राणी, अामदार विजय भांबळे, डाॅ.रामेश्वर पवार,गुलाबराव मगर, राजेंद्र लहाने, भास्करराव पिंपळकर,अशोक काकडे,अनिल नखाते,दादासाहेब टेंगसे  अादी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें