सेलू प्रतिनिधी.शमशेर खान.
सेलू (क्रीडा नगरी )महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असो. ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था, जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने, मा.खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.७डिसें. पासून कबड्डीमहर्षी शंकरराव (बुवा) साळवी क्रीडानगरी, नूतन महाविद्यालय सेलू येथे या स्पर्धेला सुरुवात झाली.
मुलांच्या फ गटात मुंबई शहरने लातूरला ५४-२२ असे नमवित विजयी सुरुवात केली. पण सख्खे शेजारी ठाणे यांनी नंतरच्या सामन्यात मुंबईची चांगलीच दमछाक केली. शेवटी मध्यांतरातील १४-२०अशा पिछाडीवरून मुंबईने ठाण्याला ३२-३२ असे बरोबरीत रोखले. या दोन्ही सामन्यात मुंबईच्या पंकज मोहितेचा अष्टपैलू खेळ, त्याला अवधूत शिंदेंची मिळालेली चढाईची, तर अमित मानेची मिळालेली पकडीची साथ या मुळे ही बरोबरी शक्य झाली. ठाण्याच्या परेश हांडे, अस्लम इनामदार यांना अन्य सहकाऱ्याची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. म्हणून त्यांना या सामन्याचे विजयात परिवर्तन करणे जमले नाही. मुलांच्या ड गटात पालघरने धुळ्यावर ४१-०९अशी सहज मात केली.पालघरच्या या विजयात राहुल सावर चमकला. धुळ्याच्या जयेश सुर्यवंशीने बरी लढत दिली. ब गटात पुण्याने साताऱ्याला ४५-२५असे पराभूत करीत आगेकूच केली. शुभम शेळके, मयूर सुर्वे, सुजित लांडगे यांचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला.
परभणी वि हिगोली सामन्यात 51-30 गुणाने परभणी संघाची विजयी सलामी मारली.
मुलींच्या फ गटात मुंबई उपनगरने औरंगाबादचा ४४-१२असा धुव्वा उडविला. शुभदा खोत, प्रतीक्षा मांडवकर, कोमल खैरे, करीना कामतेकर या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. औरंगाबाद च्या तप्ती अंधारे, निलम पाटील हिने उत्कष्ट चढाई केली. गटात साताऱ्याने सोनाली हेळवेच्या झंजावती खेळाच्या जोरावर नाशिकचा ४६-३१असा पराभव केला. नाशिकच्या निकिता धोत्रेने संघाचा पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. क गटात रत्नागिरीने बीडवर ३९-१०असा विजय मिळविला. तसमीन बुरोंडकर, सोनाली कदम, दिव्या सकपाळ, गौरी पवार यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. बीडची कोमल ससाणे एकाकी लढली.
इतर निकाल संक्षिप्त - मुली :- १)कोल्हापूर वि वि उस्मासनाबाद ड गट (६०-१०); २)अहमदनगर वि वि परभणी (४५-१९). इ गट.
मुले :- १) पालघर वि वि धुळे (४१-०९) ड गट, २)रत्नागिरी वि वि सिंधुदुर्ग (३६-२८) ब गट, ३)कोल्हापूर वि वि नाशिक (४३-३४)अ गट, ४)सांगली वि वि सोलापूर (४८-२५) क गट, ५) ठाणे वि वि जालना (६३-२५) फ गट, ५) परभणी वि वि हिंगोली (५१-३०) अ गट, ६)जळगाव वि वि नंदुरबार (५०;२३) ड गट, ७) उपनगर वि वि उस्मानाबाद (५२-१६) पंच प्रमुख गजानन मोकल, डॉ. माधव शेजुळ ,मिनानाथ दाणजी, सदानंद माजळकर, हे काम पाहत आहेत.
समितीचे अध्यक्ष मा.आ. विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कोषाध्यक्ष मंगल पांडे,जि.प.सदस्य बांधकाम सभापती अशोक काकडे, जि.प.सदस्य राजेंद्र काका लहाने, रामराव उंबाळे, सौ.इंद्रायणी बालासाहेब रोडगे, पं.स सभापती पुरूषोत्तम पावडे, विनायक पावडे, तालुका अध्यक्ष माऊली ताठे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, प्रंशात नाईक,डी.डी. सोन्नेकर, प्रा.नागेश कान्हेकर,सुभाष मोहकरे,सचिन शिंदे, भारत इद्रोके, सुधाकर रोकडे, अजय डासाळकर, पप्पू शिंदे, के.के.कदम, गणेश माळवे, भरत घांडगे, भारत धनले,दिलीप सुरवसे, किशोर भोसले,माधव लोकुलवार, रामेश्वर गाडेकर, शिवराम कदम, कैलास मोगल, गौस लाला, मंचक अंभुरे, आनंद डोईफोडे, पंकज चव्हाण आदी परीश्रम घेत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें