युवक काँग्रेस च्या वतीने सोनिया गांधी यांच्या वाढदिवस साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 11 दिसंबर 2018

युवक काँग्रेस च्या वतीने सोनिया गांधी यांच्या वाढदिवस साजरा.


शेख सलिम.भोकरदन प्रतिनिधी : शहरातील श्री गणपती इंग्लिश हायस्कूल येथे दि. 9/12/18 रविवारी भारताचे पहिले पंतप्रधान स्व पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त व अ.भा. काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस च्या वतीने भव्य चित्रकला व निबंध स्पर्धा  उत्साहात साजरे करण्यात आल्या यामध्ये शहरातील श्री गणपती इंग्लिश हायस्कूल, श्री गणपती मराठी विद्यालय, पायोनियर सीबीएसई स्कूल जोमाळा, स्व अॅड भाऊसाहेब देशमुख मराठी विद्यालय जोमळा ,प्रभात इंग्लिश स्कूल यांच्या सह अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला
  या कार्यक्रमास मा.नगराधयक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष श्री राजाभाऊ देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल देशमुख, ता अध्यक्ष त्रिंबकराव पाबळे, नगरसेवक श्री रमेश जाधव, युवक चे उपाध्यक्ष महेश दसपुते, रफिक कादरी, शेख आलीम शेख सईद शेख सलीम शाळेचे प्राचार्य बी.एम.तांबारे मुख्याध्यापक पी.बी.रोजेकर सोपान सपकाळ रोशन देशमुख यांच्या सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें