गांधी भवन कार्यालयात फटाक्यांच्या आतिशबाजीत सत्कार सोहळा संपन्न;
सिल्लोड (प्रतिनिधी) दि.27/12/2018.औरंगाबाद जिल्हा मजुर कामगार सहकारी संस्था संघ म.च्या अध्यक्षपदी अब्दुल गफ्फार अब्दुल नबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या संचालकांची बुधवार (दि 26)रोजी समर्थनगरातील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते अब्दुल गफ्फार अब्दुल नबी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.उपस्थित संचालकांनी अब्दुल गफ्फार अब्दुल नबी यांची बिनविरोध निवड केली.
चौकट.....काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात सत्कार सोहळा संपन्न;
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी अध्यक्ष अब्दुल गफ्फार अब्दुल नबी यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत जंगी स्वागत केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे,देविदास लोखंडे,प्रा. मन्सूर कादरी, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, कौतिकराव मोरे,शांतीलाल अग्रवाल, नरसिंगराव चव्हाण,दामुआण्णा गव्हाणे,शंकरराव खांडवे,सलिम हुसैन, विठ्ठलराव सपकाळ, सतिश ताठे,भिमराव काळे,इश्वर जाधव, विश्वासराव दाभाडे,अकिल वसईकर,सत्तार हुसैन, राजरत्न निकम, कैसर आझाद,राजु गौर,मतीन देशमुख, डाँ.पटेल,हनिफ मुल्तानी,निजाम पठाण,संजय फरकाडे, अनिस पठाण,मधुकरराव बेंडाळे, इम्रान कुरैशी,अफजल बेग,संजय मुरकुटे,मानसिंग राजपुत,आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें