शेख सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि . 12 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयात तालुकाध्यक्षा डाॅ . सुनीता सावंत यांच्या वतीने रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी डाॅ. सुनीता सावंत यांच्यासह नगरसेविका निर्मला ताई भिसे, माजी नगरसेविका कमलाबाई जेठे , तालुका उपाध्यक्ष सोनाबाई कोल्हे, संगीता जंजाळ, पुष्पा कानडजे , यांच्यासह महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर डाॅ. अमोल मुळे, डाॅ. सौ. शिंदे मॅडम यांच्या सह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें