सोनपेठ : स्व. उत्तमरावजी विटेकर यांनी सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नातून प्रेरणा घेऊन राजकीय वाटचाल करत असून त्यांचा आदर्श मोठा आहे असे मत जिल्हापरिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांनी केले. स्व. उत्तमराव विटेकर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सोनपेठ यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती सौ. नंदाताई यादव होत्या तर प्रमुख उपस्थितीत प. स. उपसभापती मिराताई जाधव, आशाताई गरूड, शौकत पठान, डॉ. सुभाष पवार, होते.
आज दि. 30 नोव्हेंबर रोजी स्व. उत्तमरावजी विटेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सोनपेठ यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जी. प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते या होत्या, त्यांनी स्व. उत्तमरावजी विटेकर यांच्या कार्यावर व जिवनावर प्रकाश टाकला. बोलताना वरील उद्गार काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवानराव राठोड यांनी केले व स्व. उत्तमराव विटेकर यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजीत केला असून सोनपेठ तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील लोकांच्या हितासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले आहेत. तसेच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन माजी जि. प. अध्यक्ष राजेश दादा विटेकर हे कार्य करत आहेत असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी कांतराव यादव, श्री कदम साहेब, श्री पंडित साहेब, आशाताई नखाते, यांची उपस्थिती होती, सुत्रसंचालन श्री किटे तर आभार श्री देशपांडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पंचायत समितीच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें