सिल्लोड (प्रतिनिधी) दि 11/12/2018.
मध्यप्रदेश - राजस्थान - छत्तीसगढ मध्ये भाजपाच्या हातून सत्ता हिरावून काँग्रेस पक्ष बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल सिल्लोड शहरातील डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक - निलम चौकात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांची आतिशबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मध्यप्रदेश - राजस्थान - छत्तीसगढ मधील विजय हा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखालील मोठा विजय असुन शेतकरी - शेतमजुर - गोरगरिबांविरोधात महागाई - नोटाबंदी - जीएसटी सारखे निर्णय घेणा-या भाजप सरकारचा खरा वचपा काढला असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे,शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,शांतीलाल अग्रवाल,रईस मुजावर पठाण, सत्तार हुसैन,संजय आरके, राजु गौर, मनोज झंवर,सलिम हुसैन,कैसर आझाद,राजेंद्र बन्सोड,संजय फरकाडे,दशरथ सुरडकर,राजरत्न निकम,मतीन देशमुख, अमित आरके, मनोज कोठाळे, मुश्ताक देशमुख,राधेश्याम अग्रवाल,अकिल देशमुख, मनोहर आरके,राजेश्वर आरके, मधुकर बेंडाळे, गणेश डकले,माणसिंग राजपूत,हाजी मोहम्मद हनिफ, संजय मुरकुटे,अफजल बेग,जितू आरके, इम्रान कुरैशी,जगन्नाथ कुदळ,फईम पठाण,रवि आरके, सखाराम अहिरे,साहेबराव सिरसाठ,आदिंसह काँग्रेसचे पदाधिकारी- कार्यकर्ते - नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें