मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२९: मानवत येथील नगरपरिषदचे बांधकाम अभियंता सय्यद अन्वर अशफाक रहमान यांची पदोन्नती झाल्याबद्दल बेलदार समाजसेवा मंडळ मानवतच्या वतीने दि.२९ नोव्हेंबर रोजी त्यांचा सत्कार नगरपरिषद येथे करण्यात आला.
बांधकाम विभागात कार्यरत असणारे सय्यद अन्वर यांची स्थापत्य अभियंता गट क मधुन स्थापत्य अभियंता गट ब मध्ये पदोन्नती झाल्याबद्दल बेलदार समाजसेवा मंडळ मानवतच्या वतीने त्यांचा पुष्पहार व फुलगुच्छ देऊन स्वागत करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बेलदार समाजाचे अध्यक्ष हाजी अनीस बेलदार , मुख्याधिकारी उमेश ढाकणे ,गटनेते रहिम भाई बागवान ,उबेद चाऊस,भैय्यासाहेब गायकवाड ,ओमभाऊ चव्हाण,संजय रुद्रवार,मुस्तखीम बेलदार आदी उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें